अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियत एक संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हे कुटुंब केरळचं आहे. कॅलफोर्नियातल्या घरात चार जणांचे मृतदेह मंगळवारी आढळून आहे. आनंद हेन्री, त्यांची पत्नी अॅलिस प्रियांका आणि दोन जुळी मुलं अशा चौघांचे मृतदेह आढळले आहेत. १३ फेब्रुवारीच्या दिवशी सॅन माटेओ या ठिकाणी असलेल्या घरात या चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. दोघांच्या मृतदेहांवर गोळ्या झाडल्याच्या खुणा आहेत.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातल्या दोन मृतदेहांवर गोळ्या झाडल्याच्या खुणा आहेत. तर इतर दोन मृत्यूंचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणात पोलीस आत्महत्या आणि हत्या या दोन्ही अँगलने तपास करत आहेत. एसी किंवा हिटरमधून कार्बन मोनॉक्साईड विषबाधा झाल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत का? असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यानुसारही पोलिसांनी तपास केला. मात्र पोलिसांना या घरात कुठलीही गॅस गळती किंवा उपकरणे खराब झाल्याचा पुरावा आढळला नाही.
हे पण वाचा- धक्कादायक! आईला मारहाण केल्याच्या राग, मुलाने केली वडिलांची हत्या…
सॅन फ्रान्सिस्कोतला भारतीय दुतावास भारतातील कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. दुतावासाने शोकाकूल कुटुंब आणि भआरतीय अमेरिकन समुदायप्रती शोक व्यक्त केला आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल यानंतर सगळ्या गोष्टी समोर येईल. असंही पोलिसांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.