आशिया चषकात रविवारी भारत-पाकिस्तान यांच्या हायव्होलटेज सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला त्याने केलेला एक प्रॅंक चांगलाच अंगाशी आला आहे. त्याला आता अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचे पुढे आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या रविवारी भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी उत्तर प्रदेशच्या बरेलीतील सन्याम जैस्वाल हा ४२ वर्षीय चाहता दुबईला गेला होता. यावेळी त्याने भारतीय संघाची जर्सी विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ती मिळाली नाही. अखेर त्याने पाकिस्तानी संघाची जर्सी विकत घेत मस्करी करण्याच्या करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी संघाच्या जर्सीसह फोटो काढत सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र, हे फोटो बघतात अनेकांकडून त्याला ट्रोल करण्यात आले. तर काहींनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि युपी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहणार का? शशी थरूर म्हणाले…
दरम्यान, या प्रकारानंतर सन्याम जैस्वाल याला आणि त्यांच्या घरच्यांनाही धमकीचे फोन येत आहेत. यासंदर्भात खुसाला करताना सन्याम जैस्वाल म्हमाला, ”मी एक भारतीय आहे आणि भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी मी दुबईत पोहोचलो होतो. मला भारतीय संघाची जर्सी न मिळाल्याने मी पाकिस्तानी संघाची जर्सी विकत घेतली. पाकिस्तानी जर्सी घालून हिंदूस्तान जिंदाबाद अशा घोषणा द्यायचा माजा विचार होता. मात्र, हे प्रकरण इथपर्यंत पोहोचेल याची मला कल्पना नव्हती.”
हेही वाचा – अटकेनंतर काही तासांमध्येच केआरकेची तब्येत बिघडली, अभिनेता रुग्णालयात दाखल
“या प्रकारात माझ्या घरच्यांची काहीच भूमिका नाही. माझ्या वडिलांना ह्रदयाचा आजार आहे. या टेन्शमुळे मला ह्रदयविकाराचा झटका येईल, असं ते मला म्हणाले. प्रत्येक जण मला देशद्रोही म्हणतो आहे, याचं दु:ख वाटत आहे, असेही तो म्हणाला.