भारताचा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. आपला तिरंगा ध्वज हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. मात्र याच तिरंग्याचा अपमान केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये घडली. एकीकडे स्वातंत्र्य दिवस साजरा होत होता आणि प्रयागराजमधल्या एका मदरशात तिरंग्यावर नाश्ता ठेवण्यात आला. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी व्हायरल फोटोच्या आधारे मदरसा प्रमुखासह चार जणांच्या विरोधात राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदराशात घडली आहे असं सांगितलं जातं आहे. होलागढ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा भाग येतो. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा अंथरुन त्यावरच नाश्ता दिला गेल्याचा हा फोटो आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी आंदोलन केलं. हा हंगामा इतका वाढला की पोलिसांना पाचारण करावं लागलं. या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना कारवाईचं आश्वासन दिलं आणि मदरसा प्रमुखासह चार जणांवर गुन्हा दाखल केला. नवभारत टाइम्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

मदरशात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंग्यावर नाश्ता दिला गेल्याचा हा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला. एका नेटकऱ्याने हा फोटो मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, डीजीपी, यांच्यासह अनेकांना टॅग केला. तसंच कारवाईची मागणी केली. हा फोटो समोर आल्याने गदारोळ झाला होता.

Story img Loader