लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचं प्रकरण काही तासांपूर्वी समोर आलं होतं. या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेने मोठा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराने म्हटलं आहे की, येमेनमधील हुती बंडखोरांनी या जहाजाला लक्ष्य केलं होतं. गॅबनच्या मालकीच्या या एमव्ही साईबाबा जहाजावर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, जहाजाने या भागात गस्तीवर असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेला आपत्कालीन संंदेश पाठवला होता. यूएस सेंट्रल कमांडने याबाबतची माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या जहाजावर २५ भारतीय कामगार होते जे सुरक्षित असल्याचं भारतीय नौदलाने सांगितलं आहे.

इराणने अरबी समुद्रात भारताच्या एका जहाजावर हल्ला केल्यानंतर भारताचा झेंडा असलेल्या आणखी एका जहाजावर लाल समुद्रात हल्ला झाला आहे. त्यामुळे भारतीय नौदल सतर्क झालं आहे.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?

दोन जहाजांनी लाल समुद्राच्या दक्षिणेकडे प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती तिथे गस्तीवर असलेल्या अमेरिकन नौदलाच्या जहाजाला दिली होती. अमेरिकेने याबाबत एक्सवर माहिती शेअर केली आहे. त्यानुसार, लाल समुद्रात दक्षिणेकडे प्रवास करणाऱ्या एका जहाजावर नॉर्वेचा झेंडा होता, जे ब्लेमेनेनचं जहाज होतं. येमेनमधील हुती बंडखोरांनी उडवलेलं ड्रोन त्यांच्या जहाजावरून गेलं. तर एमव्ही साईबाबा या जहाजावर या ड्रोनने हल्ला केला.

अमेरिकन लष्कराने म्हटलं आहे की, एमव्ही साईबाबा हे जहाज गॅबनच्या मालकीचं आहे आणि त्यावर भारताचा झेंडादेखील आहे. या जहाजातून कच्चं तेल वाहून नेलं जात होतं. ड्रोन हल्ल्यामुळे जहाजावर कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुजरातच्या किनारपट्टीजवळ इराणचा हल्ला

दरम्यान, या घटनेच्या काही तास आधी अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे स्फोट होऊन जहाजाच्या काही भागात आग पसरली होती. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे जहाजाचं मोठे नुकसान झालं आहे. या जहाजावर २० भारतीय कर्मचारी असल्याने भारतीय नौदलाने त्यांच्या सुरक्षेसाठी आपलं जहाज पाठवलं आहे. हा ड्रोन हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण दलाने केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हल्ला झालेल्या या ‘एमव्ही केम प्लूटो’ जहाजावर लायबेरियाचा झेंडा होता आणि ते इस्रायलशी संलग्न होतं. हे जहाज ९ डिसेंबर रोजी कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातून कर्नाटकमधील मंगळूर बंदराच्या दिशेने निघालं होतं. २५ डिसेंबरपर्यंत हे जहाज मंगळूर येथे पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु, गुजरातमधील वेरावळच्या नैऋत्येला २०० किलोमीटर आणि पोरबंदर किनाऱ्यापासून २१७ सागरी मैल अंतरावर समुद्रात या जहाजावर हवाई हल्ला झाला.