Living Planet Report 2024: जगभरात ज्यावेळी खाद्य पदार्थांचा विषय निघला जातो, तेव्हा भारतीय पदार्थांचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार मानतो जातो. आता वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (WWF) जारी केलेल्या लिव्हिंग प्लॅनेटच्या २०२४ च्या अहवालामध्ये भारतीय अन्न व्यवस्था जगभरातील देशांपेक्षा पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी सर्वोत्तम अन्न व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात भारतातील अन्न व्यवस्थेची (Indian Food System) प्रशंसा करण्यात आली आहे. जगभरातील देशांमध्ये भारताचा अन्न वापराचा नमुना सर्वात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच जगभरातील सर्व देशांनी भारताचा हा पॅटर्न स्वीकारला तर २०५० पर्यंत पृथ्वीवरील होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होतील, असंही अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, भारतानंतर इंडोनेशिया, चीन, जपान आणि सौदी अरेबिया या देशांना सर्वोत्तम अन्नप्रणालींमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तसेच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील आहार पद्धतींना सर्वात खराब दर्जा देण्यात आला आहे.

investment in banking sector
बँकिंग समभागांतील तेजीने निर्देशांकांना बळ
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
marburg virus
जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?
High Cholesterol Level in Youth Invites Future Heart Disease
तरुणांमधील उच्च कोलेस्टेरॉल पातळी देते भविष्यातील हदयविकारांना आमंत्रण!
Indices Sensex and Nifty decline to highs print eco news
नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची २६४ अंशांनी गाळण
mobile data, Internet, Urban Areas mobile data,
खालमानेतले अनलिमिटेड
most overworked countries
Most Overworked Countries in World : जगातील कोणत्या देशात सर्वाधिक तास काम करावं लागतं? भारतात किती तास काम केलं जातं?
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?

हेही वाचा : Bangladesh : बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून देवी कालीचा मुकुट चोरीला; पंतप्रधान मोदींनी दिला होता भेट

जगभरातील सर्व देशांनी भारतातील अन्न व्यवस्था किंवा खाद्यपदार्थ स्वीकारल्यास २०५० पर्यंत आपल्या पृथ्वीवरील ८४ टक्के संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतील. याचा अर्थ १६ टक्के संसाधने वापरली जाणार नाहीत. त्यामुळे जागतिक तापमानवाढही कमी करण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल. तसेच १.५° डिग्री सेल्सियसपेक्षा खूपच कमी उष्णता उत्सर्जित होईल. त्यामुळे पर्यावरण सुधारेल, असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या आहार पद्धतींना सर्वात वाईट मानांकन आलं असून या देशांमध्ये चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. या अहवालात भारतातील लोकांच्या बाजरीचे सेवन करण्याच्या पद्धतीचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच ते हवामानासाठीही चांगले असल्याचं अहवालात म्हटलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा बाजरी उत्पादक देश असून जो जागतिक उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के आहे. बाजरीच्या वापराला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरु असल्याचं म्हटलं आहे.