पीटीआय, ढाका

बांगलादेश आणि भारतामधील गेल्या दोन ते तीन महिन्यांतील तणावपूर्व संबंध दोन्ही देश लवकरच सुरळीत मार्गावर नेतील,’ असा विश्वास बांगलादेशचे परराष्ट्र खात्याचे सल्लागार महंमद तौहीद हुसेन यांनी रविवारी व्यक्त केला.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी सोमवारी बांगलादेशला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हुसेन यांनी वक्तव्य केले. बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचाराचा मुद्दा ते बांगलादेशकडे उपस्थित करण्याची शक्यता आहे. बांगलादेशात शेख हसीना सरकार जाऊन नवे हंगामी सरकार आल्यानंतर भारताच्या उच्च स्तरावरील अधिकाऱ्याचा हा पहिलाच दौरा आहे.

कोणतीही अडचण दूर करण्यासाठी परस्पर संवाद प्रस्थापित करणे खूप महत्त्वाचे आहे, असे हुसेन म्हणाले, ५ ऑगस्टनंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध बदलले आहेत आणि दोन्ही बाजूंनी संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बदललेले वास्तव स्वीकारले पाहिजे हेदेखील लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>Sambhal Violence : संभलमधील पोलिसांच्या कारवाईचे पत्नीने केले कौतुक, संतापलेल्या पतीने दिला ‘तिहेरी तलाक’ 

द्विपक्षीय व्यापारावर परिणाम

गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारातील घसरणीचा परिणाम दोन्ही बाजूंवर झाला आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील व्यवसायावर झालेल्या परिणामाचाही हुसेन यांनी उल्लेख केला.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी रविवारी आंदोलने झाली. हिंदुत्ववादी संघटनांनी कोलकाता, कांती, काकद्वीप, संदेशखाली, पुरुलिया येथे आजोयित केलेल्या रॅलीमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते.

Story img Loader