करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणा पुरती हतबल झाल्याची दिसून आली. त्यात रोज वाढणारे रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता इतर देशांनी धसका घेतला. त्यामुळे भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली. त्यात इंडियन व्हेरियंटमुळे अनेक देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. तसेच सोशल मीडियावरही इंडियन व्हेरियंटची चर्चा रंगू लागली आहे. यामुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात असल्याने माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपनींना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना व्हायरसचा B.1.617 व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं याचं वर्गीकरण घातक व्हायरसमध्ये केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हायरसचं फक्त वर्गीकरण केल्यानं त्याबाबत इंडियन व्हेरियंट हा शब्द वापरणं चुकीचं असल्याचं मत भारत सरकारने व्यक्त केलं आहे. त्यामुळे इंडियन व्हेरियंट हा शब्द असलेल्या मजकूर सोशल मीडियावरून वगळवा असं सूचना देणारं पत्र सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आलं आहे. ‘जागतिक आरोग्य संघटनेनं त्या व्हायरसला B.1.617 असं नाव दिलं आहे. त्यांच्या अहवालात कुठेच इंडियन व्हेरियंट हा शब्द नाही. त्यामुळे चुकीची माहिती पसरवणारा हा शब्द वगळावा’, असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

‘Mucormycosis’ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाल्या…

जगभरात करोना व्हायरसचे व्हेरियंट कुठे आढळतात त्यावरून त्याचा संदर्भ जोडला जात आहे. ब्राझील व्हेरियंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट अशी त्याला नावं पडली आहेत. मात्र अशा प्रकारे शब्द वापरलेला कंटेन्ट काढणं कठीण असल्याचं मत सोशल मीडिया कार्यकारणीने मांडलं आहे.

“आधी कुंभमेळ्याची चूक, नंतर चारधाम यात्रा, आपण वारंवार…”, उच्च न्यायालयानं सरकारला खडसावलं!

जगात सर्वाधिक करोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. करोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या तीन दिवसात अमेरिकेलाही मागे टाकेल अशी स्थिती आहे. देशातील करोनास्थिती हाताळण्यास केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधक वारंवार करत आहेत. त्यात सोशल मीडियावर सरकारची बदनामी होत असल्याने सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.