Amrit Mahotsav : भारतीय स्वातंत्र चळवळीच्या काळात अनेक क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेखांवर ब्रिटीशांनी बंदी आणली होती. या कविता आणि लेख भारत सरकार पुन्हा प्रकाशित करणार आहे. स्वातंत्र्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – “केंद्रानं मध्य प्रदेशप्रमाणेच आता महाराष्ट्रालाही मदत करावी”, ओबीसी आरक्षणावरून नाना पटोलेंची मागणी!

अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर एक वेगळा सेक्शन तयार करण्यात आला आहे. याच सेक्शनमध्ये १९४७ पूर्वी क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेख प्रकाशित करण्यात येणार आहे. हे सर्व साहित्य बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओडीया, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत प्रकाशित करण्यात येईल.

हेही वाचा – ५० खोके पचणार नाही, शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका – संजय राऊत

यासोबत अनेक कवितांचे व्हिडीओ देखील येथे प्रकाशित करण्यात आले आहे. यामध्ये ‘आझादी की बांसुरी’, ‘राष्ट्रीय पताका’, ‘भारत मठ गीतम’, ‘दरिद्रा नियान’, ‘कसुंबी नो रंग’ आदी कवितांचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान ६६ आठवड्यांमध्ये ४७ हजार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर मलेशिया आणि इंडोनेशियामधून सायबर हल्ले; दोन हजारांहून अधिक वेबसाइट केल्या होत्या हॅक