भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याच्याविरुद्ध भारतीय वंशाच्या आंतरराष्ट्रीय हॉकीपटूने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. २१ वर्षांच्या या तरुणीने लुधियाना पोलिसांकडे सरदार सिंगविरोधात रितसर लेखी तक्रार दिली आहे.
संबंधित तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सरदार सिंग आणि तिचे गेल्या चार वर्षांपासून संबंध आहेत. या काळात त्याने आपली मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे. सरदार सिंग याने आपल्या पोटातील एका अपत्याचा गेल्यावर्षी गर्भपात करायला लावला आणि त्यानंतर त्याने आपल्याशी लग्न करण्यासही नकार दिला, असेही या तरुणीने म्हटले आहे.
या संदर्भात लुधियानाचे पोलीस आयुक्त पी. एस. उमरांनगल म्हणाले की, संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीची शहानिशा आम्ही करीत आहोत. अजून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. लुधियाना पोलीस तपास करीत आहेत.
सरदार सिंग आणि आपली लंडन ऑलिम्पिकमध्ये ओळख झाली आणि तेथून पुढे आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आमच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सरदार सिंग याने गेल्यावर्षी गर्भपात करण्यासाठी माझ्यावर खूप दबाव टाकला, असेही तिने म्हटले आहे.
हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
२१ वर्षांच्या या तरुणीने लुधियाना पोलिसांकडे सरदार सिंगविरोधात रितसर लेखी तक्रार दिली आहे
Written by वृत्तसंस्था
Updated:
आणखी वाचा
First published on: 03-02-2016 at 11:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian hockey captain sardar singh accused of sexual harassment