मुंबई : पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाचा करण्यात आलेला शिरच्छेद आणि त्यानंतर मुस्लीम समाजातील धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी केलेल्या बेछूट वक्तव्यांचा भारतातील सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, पोलीस दलातील माजी उच्चपदस्थ अधिकारी, कवी, पत्रकार तसेच कायदेतज्ज्ञांनी एका निवेदनाद्वारे तीव्र निषेध केला आहे.
‘‘भारतीय मुस्लिमांचे काही स्वयंनियुक्त पालक आणि काही देशांच्या प्रमुखांनी थंड रक्ताने करण्यात आलेल्या या हत्येचे समर्थन केले आहे, त्यामुळे आपण व्यथित झालो आहोत’’, असे या निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, स्वरा भास्कर, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर, तिस्ता सेडलवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील १३० मान्यवरांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
‘‘श्रद्धेच्या नावाखाली फ्रान्समध्ये दोघा धर्माधांनी अलीकडेच हत्याकांड घडविले, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत. या हत्यांचे काहींनी समर्थन केले, त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे घडतात तेव्हा सर्व धार्मिक गट आपल्या कंपूचे समर्थन करतात हे नित्याचेच झाले आहे. इतरांनी जे गुन्हे केलेले असतात त्यांच्याशी गुन्ह्य़ाची तुलना करून त्याचे समर्थन करणे हेच असमर्थनीय आणि मूर्खपणाचे आहे, कारण दोघांच्या चुका योग्य होऊ शकत नाहीत, धर्माच्या नावाखाली गुन्ह्य़ाचे जर-तरने कोणी समर्थन करीत असेल तर ते आम्हाला अमान्य आहे. हत्येचे समर्थन करताना देव, देवता, प्रेषित किंवा संत यांचा आधार घेतला जाऊ नये ’’, असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.
ज्येष्ठ कवी जावेद अख्तर, मल्लिका साराभाई, ज्येष्ठ वकील मिहीर देसाई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक अनिल धारकर, चित्रपट दिग्दर्शक कबीर खान, आनंद पटवर्धन, मानवी हक्क कार्यकर्ते हेन्री तिफाग्ने, डॉ. पुनयानी, अभिनेत झीशान अयूब यांच्याही निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
फ्रान्समधील मुस्लिमांना आवाहन
निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांनी हत्येचा निषेध करण्यासाठी ‘फ्रेन्च कौन्सिल फॉर द मुस्लीम फेथ’ला पाठिंबा दर्शविला आहे, त्याचप्रमाणे फ्रान्समधील सर्व मुस्लीमांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करावे आणि बळी पडलेल्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांना समर्थन द्यावे, असे आवाहनही या मान्यवरांनी केले आहे.