हैदराबादमधील मक्का मशिदीत २००७च्या सुरुवातीला झालेल्या स्फोटांचा बदला घेण्यासाठीच इंडियन मुजाहिदीनने त्यावर्षी हैदराबादमधील गोकूळ चाट आणि लुंम्बिनी पार्कमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले, अशी कबुली गेल्या आठवड्यात भारतातील सुरक्षायंत्रणांनी जेरबंद केलेला त्या संघटनेचा म्होरक्या यासिन भटकळ याने एनआयएच्या अधिकाऱयांना दिली. 
दाऊदसह एकेकाला भारतात परत आणू
बिहार राज्यातील नेपाळच्या सीमेवरून भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर याला एनआयए आणि पोलिसांनी गेल्या बुधवारी रात्री अटक केली. दिल्लीतील न्यायालयाने त्यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एनआयएचे अधिकारी सध्या भटकळकडून त्याने देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांची माहिती घेत आहेत.
हैदराबादेतील स्फोटाचे आदेश पाकमधूनच
मे २००७ मध्ये मक्का मशिदीमध्ये झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भटकळने हैदराबादमधील दोन ठिकाणी केलेल्या बॉम्बस्फोटात ४५ लोकांचा मृत्यू झाला होता. एनआयएने केलेल्या तपासात हिंदू धर्मातील कट्टरवाद्यांनी हैदराबादमधील मशिदीत बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे २०११ मध्ये स्पष्ट झाले होते. याप्रकरणी एनआयएने संबंधितांविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले.
हैदराबादमध्ये स्फोट घडवून आणणाऱया दहशतवाद्यांना आपणच प्रशिक्षण दिले होते, याचीही कबुली भटकळने दिलीये. अकबर चौधरी आणि त्याचा भाऊ मोहसिन चौधरी यांना भटकळने प्रशिक्षण दिले होते. यापैकी अकबर चौधरीला पोलिसांनी याआधीच अटक केली असून मोहसिन चौधरी अद्याप फरार आहे.

Story img Loader