गुजरातमधील सुरत शहरात छोट्या अणुबॉम्बचा स्फोट घडविण्याचा कट इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने आखला होता. इंडियन मुजाहिद्दीनच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या यासीन भटकळने हा खुलाला केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
त्याचबरोबर सुरतवरील अणुबॉम्ब हल्ल्याची योजना ही पाकिस्ताननची होती अशी कबुलीही भटकळने दिली आहे.
दहशतवादी यासिन भटकळच्या ११ साथीदारांची ओळख पटली
सुरतवर अणुबॉम्ब हल्ला करणार होतो परंतु, मला अटक करण्यात आल्यामुळे सुरत शहर वाचले अशी कबुली यासीन भटकळने दिली. यासीनच्या या जबाबानंतर तपास यंत्रणांनी धाबे दणाणले आहेत. कारण, यासीनच्या या माहितीवरून पाकिस्तानातील अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत. दहशतवादी केव्हाही त्याचा गैरवापर करू शकतात असा संशय खरा ठरला आहे.
राजकारण्यांवर हल्ल्याचा प्रयत्नात होती इंडियन मुजाहिदीन
इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख असलेल्या अहमद जरार सिद्दिबाप्पा उर्फ यासिन भटकळ याला ऑगस्ट महिन्यात नेपाळमधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून एनआयए, आयबी व विविध राज्यांच्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
कराचीत जायला ‘व्हिसा’ लागत नव्हता – यासिन भटकळ

Story img Loader