२०१९च्या लोकसभा निवडणुकीतील गाजलेला प्रमुख मुद्दा होता राफेल लढाऊ विमानं आणि ही विमाने खरेदी करतांना झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोप. यामुळे सर्वानाच राफेल हे नाव माहिती झाले आहे. भारतीय वायूदलासाठी लढाऊ विमानांची आवश्यकता लक्षात घेता २०१६ मध्ये फ्रान्स देशाबरोबर ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याबाबत आपण करार केला होता. आत्तापर्यंत ३० विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली असून उर्वरीत सहा लवकरच दाखल होणार आहेत.

आता भारतीय वायूदलानंतर आता भारतीय नौदलही राफेल लढाऊ विमाने घेण्याबाबत चाचपणी करत आहे. सध्या भारताच्या नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका असून यावर रशियन बनावटीची ‘मिग-२९ के’ जातीची लढाऊ विमाने तैनात आहेत. तर या वर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात नौदलात स्वदेशी बनावटीची विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रांत सेवेत दाखल होणार आहे, या युद्धनौकेच्या युद्धपातळीवर चाचण्या सध्या सुरु आहेत.

loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

नवी विमानवाहु युद्धनौका नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज होत असून यावर कोणती लढाऊ विमाने असावी याबाबत नौदलाची चाचपणी सुरु आहे. यासाठीच नौदल विविध लढाऊ विमानांचा पर्याय तपासून बघत आहे.

नौदलाची नेमकी गरज काय आहे ?

विमानवाहु युद्धनौकेवरुन ऑपरेट करता येतील अशा विशिष्ट लढाऊ विमानांची आवश्यकता नौदलाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमानवाहु युद्धनौकांवरील डेक-सपाट पृष्ठभाग ज्याचा उपयोग विमानतळाच्या धावटपट्टीसारखा केला जातो, त्या छोट्याशा जागेवरुन झेप घेता येईल असं शक्तीशाली इंजिन असलेलं लढाऊ विमान नौदलाला हवं आहे.

कोणत्या विमानांची चाचपणी नौदल करत आहे ?

जगात विमानवाहु युद्धनौकांवरुन वापरली जाणारी काही मोजकी ४-५ प्रकारची लढाऊ विमाने आहेत. यापैकी दोन पर्याय हे भारतीय नौदलापुढे आलेले आहेत ते म्हणजे अमेरिकेच्या बनावटीचे एफ-१८ आणि फ्रान्स बनावटीचे राफेल. या दोन्ही विमानांचे इंजिन शक्तीशाली असून विमानवाहू युद्धनौकांवरच्या छोट्या धावपट्टीवरुन हवेत झेप घेण्याची क्षमता यामध्ये आहे. विशेष म्हणजे एफ-१८ हे अमेरिकेच्या नौदलात तर राफेल हे फ्रान्स नौदलात कार्यरत असून तिथे या लढाऊ विमानांनी कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

नौदलासाठीचे राफेल हे कसे वेगळे आहे ?

भारतीय वायुदलाकडे असलेल्या राफेलपेक्षा नौदलाच्या चाचणीसाठी आलेले राफेल जरा वेगळे आहे. पायलटला छोटी धावपट्टी सहज दिसावी यासाठी पायलटची जागा जरा उंचावण्यात आली आहे, यासाठी राफेलचा पुढचा भाग – कोन हा काहीसा झुकलेला ठेवण्यात आलेला आहे. नौदलाच्या चाचणीसाठी आलेल्या राफेलचे इंजिन हे वायुदलाकडे असलेल्या राफेलच्या इंजिनापेक्षा जरा जास्त शक्तीशाली आहेत. विशेष म्हणजे विमानवाहु युद्धनौकेच्या छोट्या धावपट्टीवर उतरण्यासाठी या लढाऊ विमानाच्या शेपटाच्या ठिकाणी हुक असणार आहे.

एफ-१८ आणि राफेल यांच्या चाचण्यांना लवकरच गोवा इथे सुरुवात होणार आहे. नौदलाच्या लढाऊ विमानांच्या चाचण्यांसाठी इथे पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तेव्हा या वर्षी नवी विक्रांत दाखल होईल, तोपर्यंत यापैकी कोणत्या लढाऊ विमानाची निवड नौदलासाठी केली जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.