आफ्रिकेतील सोमालिया देशाजवळ गुरूवारी ( ४ जानेवारी ) एका जहाजाचे अपहरण करण्यात आलं होतं. या जहाजावर १५ भारतीय सदस्यही काम करते होते. ‘एमव्ही लीला नॉरफोक’ असं अपहरण झालेल्या जहाजाचं नावं होतं. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदल सक्रिय झाले. त्यानंतर आता ‘एमव्ही लीला नॉरफोक’ जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“उत्तर अरबी समुद्रात ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या जहाजाचं अपहरण केल्याची माहिती मिळतातच भारतीय नौदलानं तातडीनं कारवाई केली. जहाजावरील १५ भारतीयांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली आहे. मार्कोने ( नौदल सैनिक ) जहाजावर शोधमोहिम केली. पण, अपहरणकर्ते आढळून आले नाहीत,” असं भारतीय नौदलानं म्हटलं आहे.

मार्कोसला जहाजावर अपहरणकर्ते आढळून आले नाहीत. सुटका करण्यात आलेल्या सदस्यांनी सांगितलं की, अपहरण करताना अपहरणकर्त्यांनी जहाजावर गोळीबार केला. त्यानंतर आश्रय घेऊन ते लपून बसले होते.

दरम्यान, भारतीय नौदलाचे प्रमुख आर. हरी कुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना अपहकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.