भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता महिलांनाही नौदलाच्या मरिन कमांडोजच्या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होता येणार आहे. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वृत्तानुसार, महिलांनी ठरलेले निकष पूर्ण केले तर त्यांनाही नौदलात मरिन कमांडो म्हणून भरती होता येणार आहे. असं असलं तरी कोणालाही थेट मरिन कमांडो म्हणून भरती होता येत नाही. नौदलात भरती झाल्यानंतर मरिन कमांडो होण्यासाठीचे निकष पूर्ण करून मगच ‘स्पेशल फोर्स’मध्ये भरती होता येते.

पुढील वर्षीपासून अग्निवीर म्हणून नौदलात दाखल होणाऱ्या महिला अधिकारी किंवा सेलर यांना मरिन कमांडोच्या पात्रतांच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करून या पदावर काम करता येईल.

स्पेशल फोर्सेस काय आहे?

भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तिन्ही दलात स्पेशल फोर्सेस आहेत. या स्पेशल फोर्सेसमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही तग राहू शकतील असे मानसिक आणि शारीरिक पातळीवरील सदृढ सैनिकांची भरती केली जाते. यासाठी त्यांना खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं आणि विशेष काठिण्य पातळी पार करावी लागते. त्या निकषांवर संबंधितांनी स्वतःला सिद्ध केल्यानंतरच त्यांना या स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल केले जाते.

आतापर्यंत या स्पेशल फोर्समध्ये केवळ पुरुषांनाच भरती होण्यास परवानगी होती. मात्र, आता महिलाही या निकषांवर स्वतःला सिद्ध करत या स्पेशल फोर्समध्ये दाखल होऊ शकणार आहेत. नौदलातील एक स्पेशल फोर्स म्हणजे मरिन कमांडो (मार्कोज).

हेही वाचा : विश्लेषण: आंतरराष्ट्रीय तस्करांकडून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नव्या मार्गाचा वापर; तालिबान्यांचा मोठा हातभार, वाचा सविस्तर!

मरिन कमांडो कोण असतात?

भारतीय नौदलात १९८७ मध्ये मरिन कमांडोंच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला या पथकाचं नाव ‘इंडियन मरिन स्पेशल फोर्सेस’ असं होतं. १९९१ नौदलाने हे नाव बदललं आणि ‘सबोटेड फोर्सेस ऑफ मरिन’ (मरिन कमांडो फोर्स) असं ठेवलं. त्याचाच शॉर्ट फॉर्म मार्कोज असा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy to allow women to join marine commando special forces pbs
Show comments