देहविक्रयाच्या हेतूने मानवी तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ब्रिटिश न्यायालयाने एकूण ३४ वर्षांचा तुरुंगवास जाहीर केला असून त्यापैकी रमेश माळी (वय ३१) या अनिवासी भारतीयास अडीच वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
वूड ग्रीन क्राऊन न्यायालयाने गेल्या आठवडय़ात हा निकाल जाहीर केला. माळीने हंगेरीहून ब्रिटनला सक्तीने आणलेल्या एका महिलेशी विवाह केला आणि तिला देहविक्रय व्यवसायात लोटल्याचे उघड झाले आहे. देहविक्री व्यवसायातील मोठी टोळीच यामुळे उघड होण्याची शक्यता आहे. या महिलेने मार्च २०१० मध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावरील अत्याचारांची माहिती दिली होती. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले होते.
माळी याच्याबरोबर संदूर जोनास, अनिता व्हिक्टोरिया मोले, तिचा भाऊ व्हिक्टर, तसेच बोगस विवाह लावण्यासाठी मदत करणारी वकील चिका इके मिशेल यांनाही अटक झाली आहे. संदूर जोनास आणि व्हिक्टोरिया हे दोघे परदेशातून स्त्रियांना फसवून वा सक्तीने ब्रिटनमध्ये आणत असल्याचे उघड झाले आहे. त्यांना प्रत्येकी दहा वर्षांची सजा झाली आहे. व्हिक्टर आणि अॅड. मिशेल यांना प्रत्येकी पाच वर्षांची सजा झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा