संयुक्त अरब अमिरातीच्या एका बडय़ा उद्योजकाने इराकमधून भारतात परतलेल्या ४६ परिचारिकांना नोकरी देण्याची तयारी दर्शवली होती. या परिचारिका महिनाभर इराकमध्ये इसिसच्या अतिरेकी कारवायांमुळे अडकून पडल्या होत्या. त्यांना शनिवारी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले.
एनएमसी हेल्थकेअर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. आर. शेट्टी यांनी या परिचारिकांना हा देकार दिला असून ते त्यांना संयुक्त अरब अमिरातीत नोकरी देऊ इच्छितात, असे या समूहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंसाचारग्रस्त इराकमध्ये काम करणाऱ्या या परिचारिकांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. शेट्टी हे अमिरात, इजिप्त व भारतातील काही रुग्णालयांचे चालक व मालक असून त्यांनी या परिचारिकांना नोकरी देण्याचा प्रस्ताव केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांना पाठवला आहे. शनिवारी परत आलेल्या परिचारिकांमध्ये ४५ केरळच्या तर एक तामिळनाडूच्या तुतिकोरिन येथील आहे.
‘त्या’ परिचारिकांना नोकऱ्या देण्यास अमिरातीतील उद्योजक तयार
संयुक्त अरब अमिरातीच्या एका बडय़ा उद्योजकाने इराकमधून भारतात परतलेल्या ४६ परिचारिकांना नोकरी देण्याची तयारी दर्शवली होती.
First published on: 07-07-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian nurses stranded in iraq offered jobs in uae