एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरला विमानात १४ वर्षीय मुलीसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याप्रकरणी बोस्टन फेडरल न्यायालयाने निकाल दिला आहे. मे २०२३ मध्ये होनोलुलूहून बोस्टनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करणाऱ्या डॉ. सुदिप्ता मोहंती या ३३ वर्षीय भारतीय अमेरिकन डॉक्टरने १४ वर्षांच्या मुलीकडे पाहत विमानात हस्तमैथून केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) डॉक्टरला अटक केली होती. त्यानंतर काही महिने याप्रकरणी बोस्टन फेडरल न्यायालयात सुनावणी झाली. अखेर न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे.
बोस्टन फेडरल न्ययालयात तीन दिवसीय सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने डॉ. सुदिप्ता मोहंती यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुदिप्ता मोहंती यांच्याविरोधातले आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, डॉ. मोहंती यांनी म्हटलं आहे की, “या आरोपांमुळे आणि अटकेमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. मला कळत नव्हतं की, माझ्यावर अशा प्रकारचे आरोप का केले जात आहेत.” मोहंती यांनी लिखित निवेदन जारी करून म्हटलं आहे की, त्या दिवशी विमानातून प्रवास करताना माझी होणारी बायको माझ्या शेजारीच बसली होती. तरीदेखील माझ्याबरोबर असं सगळं का होतंय, तेच मला कळत नव्हतं. मी एक डॉक्टर म्हणून माझं आयुष्य लोकांची देखभाल करण्यासाठी समर्पित केलं आहे. या काळात माझ्यावर झालेल्या आरोपांनंतर माझं पद आणि रुग्णालय सोडणं माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं.
मेसॅच्युसेट्समधील डॉ. सुदिप्ता मोहंती यांना ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. “युनायटेड स्टेट्सचं विशेष विमान कार्यक्षेत्रात असताना अश्लील आणि असभ्य कृत्ये केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. बोस्टनमधील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमधील प्राथमिक काळजी चिकित्सक डॉ. मोहंती या विमानाने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी एक १४ वर्षांची मुलगी बसली होती. ती तिच्या आजोबांबरोबर प्रवास करत होती. प्रवासादरम्यान मुलीच्या लक्षात आलं की ३३ वर्षीय व्यक्तीने एक ब्लँकेट अंगावर ओढलं आहे. यावेळी त्याचा पाय वर-खाली होत होता. यावेळी अचानक त्याच्या अंगावरील चादर खाली आली. तेव्हा मोहंती हस्तमैथून करत होते, असा आरोप त्या मुलीने केला होता. बोस्टनमध्ये उतरल्यानंतर मुलीने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. परंतु, हे आरोप डॉ. मोहंती यांनी नाकारले होते. ही घटना मला आठवत नाही, असं ते म्हणाले होते.
हे ही वाचा >> “…तर वाराणसी मतदारसंघात मोदींच्या पराभवासाठी मोहीम सुरू होईल”, भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना इशारा
दरम्यान, आता या आरोपांमधून मोहंती याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी मोहंती दोषी आढळले असते तर, त्यांना या आरोपांखाली ९० दिवसांपर्यंत तुरुंगवास, एक वर्ष पर्यवेक्षित सुटकेपर्यंत आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा भोगावी लागली असती.