US Senate confirms Indian-origin Kash Patel as New FBI Director : भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली आहे. काश पटेल हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान काश पटेल यांना एफबीआयचे पुढील संचालक नियुक्त करण्याच्या बाजूने ५१ मते तर विरोधात ४९ मते पडली. रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मक्रोव्स्की यांनी देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्याबरोबर पटेल यांच्या नियुक्तीच्या विरोधात मत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची निवडणुकी जिंकल्यानंतर लगेत पटेल यांच्याकडे एफबीआयची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती, आता यावर सिनेटने देखील शिक्कामोर्तब केले आहे. काश पटेल यांचे भारतातील गुजरातशी संबंध राहिले आहेत. पटेल यांनी यापूर्वा डिफेंडर आणि न्याय विभागात दहशतवाद विरोधी अभियोक्ता म्हणून काम केले आहे.

एफबीआय संचालक म्हणून काश पटेल यांचा कार्यकाळ हा १० वर्षांचा असेल. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा काश पटेल यांनी घेतली आहे.

काश पटेल यांचे भारताशी खास नाते राहिले आहे. त्यांचे आई-वडील हे गुजरातहून न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. दोघे आधी कॅनडा येथे राहिले नंतर १९७० मध्ये अमेरिकेत गेले. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या फटेल यांनी आपल्या गुजराती ओळख कायम अभिमानाने जाहीर केली आहे.

काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठ आणि पेस यूनीव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ येथून कायद्याची पदवी घेतली आहे. पटेल यांनी २०१७ मध्ये तात्कालीन ट्रम्प प्रशासनात शेवटचे काही दिवस चीफ ऑफ स्टाफ म्हणून देखील काम केले होते.