नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाइस्ट’ ही वेबसीरीज चांगलीच गाजली होती. आजही या वेबसीरीजचे अनेक चाहते आहेत. जगभरात जेव्हा मोठी चोरी केली जाते, तेव्हा त्याची तुलना मनी हाइस्टशी केली जाते. कॅनडामध्ये अशीच एक हायप्रोफाइल चोरी उघड झाली आहे. कॅनडाच्या पील प्रांतातील पोलीस प्रमुख निशाण दुराईअप्पा म्हणाले की, ही चोरी सनसनाटी अशा पद्धतीची आहे. त्यामुळे आम्ही गमतीने याची तुलना नेटफ्लिक्सवरील सीरीजशी केली. कॅनडामधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी चोरी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
कॅनडाच्या प्रशासनाने नऊ लोकांना अटक केली आहे. यामध्ये काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. एप्रिल २०२३ मध्ये झुरिच स्वित्झर्लंडमधून सोन्याने भरलेला कार्गो कंटेनर टोरंटोच्या पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आला होता. चोरट्आंनी एअर कॅनडाच्या दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही चोरी केली होती. या कार्गोमध्ये शुद्ध सोन्याची ६,६०० बिस्किटे होती. ज्याचे वजन ४०० किलो आणि त्याचे मूल २० दशलक्ष डॉलर एवढे होते. तसेच २.५ दशलक्ष किंमतीचे परकयी चलनही या कार्गोत होते.
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
१७ एप्रिल २०२३ मध्ये दुपारी ३.५६ मिनिटांनी पिअर्सन विमानतळावर झुरिचवरून आलेले विमान उतरले. विमान उतरल्यानंतर काही वेळेतच त्यातील सोन्याने भरलेला कंटनेर विमानतळाच्या गोदामात हलविण्यात आला, अशी माहिती पील प्रांताच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तेव्हापासून विमानतळाच्या गोदामातील सदर कंटेरन चोरी झाला होता. पिअर्सन विमानतळावरील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला भेदून मोठ्या शिताफीने हा कंटेनर लांबविला गेला. त्यामुळेच या चोरीची तुलना मनी हाईस्टशी केली जात होती.
१८ एप्रिल २०२३ रोजी कॅनडा पोलिसांनी या चोरीची दखल घेऊन आपला तपास सुरू केला. या चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी अमेरिकेच्या मद्य, तंबाखू, शस्त्र आणि स्फोटक विरोधी पथकाचीही (ATF) मदत घेतली. वर्षभर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आता कॅनडाच्या पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. ज्यामध्ये काही भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. परमपाल सिद्धू, अमित जलोटा, अम्मद चौधरी, अली रझा, प्रसाद परमलिंगम, सिमरन प्रित पानेसर, अरचित ग्रोव्हर आणि अर्सलन चौधरी या भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.
त्यापैकी परमपाल सिद्धू (५४ वय) हा एअर कॅनडाचा कर्मचारी आहे. चोरीचा गुन्हा घडवून आणण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. अमित जलोटा, सिमरन प्रित पानेसर हे तिघे एअर कॅनडाचे माजी कर्मचारी आहेत.
या चोरांनी चोरी केलेले सोने वितळवून विक्री केले आहे. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी शस्त्रसाठा खरेदी केला. पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्याकडून ६५ बंदुका जप्त केल्या आहेत. तसेच आणखीही शस्त्रसाठा असल्याचा संशय व्यक्त करत तपास सुरू ठेवला आहे.