भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. पंतप्रधानपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक लढल्यानंतर त्यांचा विजय झाला. यापूर्वी सप्टेंबर, २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुनक यांना लिझ ट्रस यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. पण लिझ ट्रस यांनी अवघ्या सहा आठवड्यांत आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे सुनक यांना हुजूर पक्षातील बहुतांशी खासदारांचा पाठिंबा मिळाला.

आर्थिक संकटांचा आधीच होता अंदाज
मागील निवडणुकीच्या काळात ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात आर्थिक प्रश्नांवरून संघर्ष निर्माण झाला होता. महागाईचं संकट आ वासून उभं असताना लिझ ट्रस यांची कर्ज घेण्याची योजना ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला अराजकतेकडे घेऊन जाईल, असा अंदाज सुनक यांनी आधीच वर्तवला होता.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
British Indians stripped of honours by the UK Crown
हिंदूंची बाजू घेतल्याने अन् मोदींचे समर्थन केल्याने किंग चार्ल्स यांनी दोन ब्रिटीश भारतीयांना दिलेला सन्मान परत घेतला; प्रकरण काय?
Chief Minister Devendra Fadnavis statement regarding the assurances given
उपमुख्यमंत्री असताना दिलेली हमी पूर्ण झाली नाही, आता मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस… 
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…
deputy chief minister position does not exist in constitution but post not unconstitutional
 ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून शपथ घेता येते का?
Nana Patole statement regarding the new government Devendra fadnavis
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागण्याची भिती, नाना पटोले म्हणतात, ‘नवीन सरकार गुजरातधार्जिणे…’

स्थलांतरित कुटुंबात झाला जन्म
ऋषी सुनक यांच्या आई-वडिलांनी पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं होतं. ते दोघेही भारतीय वंशाचे आहेत. सुनक यांचा जन्म १९८० साली इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये झाला. आता ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले आहेत.

२०१५ मध्ये पहिल्यांदा बनले खासदार
२०१५ साली सुनक पहिल्यांदा उत्तर यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात वेगानं प्रगती केली. बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुनक यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सुनक हे सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत…
सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ही भारतीय अब्जाधीश नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. तर सुनक यांनी स्वत: Goldman sachs बँकेत आणि दोन हेज फंड्ससाठी (hedge funds) काम केलं आहे. ‘द संडे टाइम्स’च्या एका अहवालानुसार ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती सुमारे ७३० दशलक्ष पौंड इतकी असल्याचा अंदाज आहे.

पत्नीने कर चुकवल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात
अक्षता मूर्ती यांनी परदेशात केलेल्या कमाईवर ब्रिटनमध्ये कोणताही कर भरला नाही, यामुळे ऋषी सुनक वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विशेष म्हणजे जे ब्रिटनचे नागरिक नाहीत, त्यांना या करातून सूट मिळते. अक्षता मूर्ती ब्रिटनमध्ये राहत असल्या तरी त्यांनी अद्याप भारताचं नागरिकत्व सोडलं नाही. या नियमानुसार अक्षता मूर्ती ब्रिटनमध्ये कर भरण्यास पात्र नाहीत, यामुळे सुनक यांनी आपल्या पत्नीचा बचाव केला होता. या प्रकरणामुळे ऋषी सुनक वादाच्या भोवऱ्यात सापजले होते.

सुनक यांना सुपर हिरो ‘जेडी’ व्हायची इच्छा होती
ऋषी सुनक यांनी २०१६ मध्ये, एका शाळकरी मुलांच्या गटाला सांगितलं होतं की, त्यांना मोठं झाल्यावर सुपर हिरो ‘जेडी नाइट’ व्हायचं होतं. ‘द एम्पायर स्ट्राइक्स बॅक’ हा सुनक यांचा आवडता स्टार वॉर्स चित्रपट आहे.

Story img Loader