Crime News : आई आणि मुलाचं नातं हे जगातलं सर्वात प्रेमाचं, आपुलकीचं आणि मायेचं नातं असतं. या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या ११ वर्षांच्या मुलाला डिन्सेलँड या ठिकाणी फिरायला नेलं आणि त्याच ठिकाणी त्याची गळा चिरुन हत्या केली. तसंच त्यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आईने मुलाची हत्या केल्याची घटना कुठे घडली?
सरीता रामराजू या ४८ वर्षीय महिलेने तिच्या ११ वर्षांच्या मुलाला न्यूयॉर्कच्या डिस्नेलँड या ठिकाणी फिरायला नेलं. तिथे गळा चिरुन त्याची हत्या केली. सरीता रामराजू या भारतीय वंशाच्या आहेत. ही महिला कॅलिफोर्निया या ठिकाणी राहते. सरीता रामराजू आणि त्यांच्या पतीचा घटस्फोट २०१८ मध्ये झाला. या महिलेच्या मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे आहे. मात्र न्यायालयाने सरीताला तिच्या मुलाला भेटण्याची संमती दिली आहे. मुलाची हत्या करण्याच्या आधी सरिता तिच्या मुलासह सँटा अॅना येथील एका मॉटेलमध्ये थांबली होती. तिने तिच्यासाठी आणि ११ वर्षांच्या तिच्या मुलासाठी डिस्नेलँडचे तीन दिवसांचे पास घेतले होते. सरिता घटस्फोटानंतर कॅलिफोर्नियमध्ये राहते. ती मुलाला भेटण्याच्या निमित्ताने आली आणि त्यानंतर तिने मुलाची हत्या केली.
१९ मार्चला काय घडलं?
१९ मार्चला सरीता आणि तिच्या मुलाला मॉटेलमध्ये परत जायचं होतं. त्याचे वडील त्या मुलाला घेण्यासाठी येणार होते. मात्र त्याच दिवशी सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी तिने पोलिसांना फोन करुन सांगितलं की मी माझ्या मुलाची हत्या केली आहे. सांता अॅनाचे पोलीस जेव्हा मॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की सरीताचा मुलगा बिछान्यावर मृतावस्थेत होता. ऑरेंज काऊंटी येथील जिल्हा अटॉर्नी कार्यालयाने या घटनेसंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. सरीता रामराजूला या प्रकरणात २६ वर्षांची शिक्षा होऊ शकते असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांना सरीताने काय सांगितलं?
सरीताने पोलिसांना सांगितलं की, मॉटेलमध्ये जो चाकू होता तो तिने मुलाची हत्या करण्याच्या एक दिवस आधी खरेदी केला होता. त्यानंतर तिने मुलाची गळा चिरुन हत्या केली. सरीताने हेदेखील सांगितलं की तिने यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मुलाचं नाव तेथील मीडियाने जाहीर केलेलं नाही. सरीता आणि तिचा पती प्रकाश यांचा घटस्फोट २०१८ मध्ये झाला. त्यानंतर मुलाची कस्टडी कुणाकडे असेल? यावरुन दोघांमध्ये कायदेशीर वाद सुरु होता. तोपर्यंत मुलाची कस्टडी त्याच्या वडिलांकडे देण्यात आली होती. आता सरीताने तिच्याच ११ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे.