भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीय नागरिकांची आकडेवारी भारत सरकारने जारी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी सरासरी १.५ लाख नागरीक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. तसेच त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नागरिकत्वाचा सोडणाऱ्या भारतीयांची आकडेवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान देण्यात आली. दरवर्षी सरासरी १.५ लाख लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. तसेच या नागरिकांची पहिली पसंती अमेरिकेला आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, ”२०२१ मध्ये १,६३,३७० लोक भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत. तर २०२० मध्ये ८५, २५६ आणि २०१९ मध्ये १, ४४, ०१७ नागरीक भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये दुप्पट नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याचे यावरून दिसून येते”

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Updates in Marathi
Ladki Bahin Yojana December Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा; २१०० रुपये कधी मिळणार? अर्जांची छाननी होणार का? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!
The Ministry of External Affairs (MEA) said it has received a note verbale from Bangladesh interim government
Shaikh Hasina Extradition : “शेख हसीना यांना परत पाठवा”, बांगलादेशची भारताला विनंती; भारताची प्रतिक्रिया काय?
Macoca , Demand of Marathi family,
मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी
kalyan east marathi family case, immigrant family complaint, marathi family,
कल्याण पूर्वमध्ये मराठी कुटुंबानेही मारहाण केल्याची परप्रांतियांची तक्रार

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची अमेरिका ही पहिली पसंती ठरत आहे. २०१९ मध्ये ६१, ६८३ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. २०२० मध्ये ३०, ८२८ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक ७८,२८४ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडत अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये स्थायिक होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. २०१९ मध्ये एकाही भारतीय नागरिकाने पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले नव्हते. तर २०२० मध्ये ७ भारतीय नागरिकांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले. २०२१ मध्ये हा आकडा ४१ वर पोहोचला आहे. तर २०२१ मध्ये एका व्यक्तीने बांगलादेशचे नागरिकत्व घेतले आहे.

हेही वाचा – “संजय राऊतांचा सकाळचा शो बंद झाला आहे, ते दखल घेण्यासारखे नाहीत”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

२०२१ मध्ये २३, ५३३ भारतीयांनी ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतले, तर २१, ५९७ भारतीयांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतले. तसेच १४६३७ भारतीयांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. २०१९ मध्ये ५३६ नागरिकांनी चीनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तर २०२० मध्ये ५५६ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडत चीनचे स्थायिक झाले आहे. २०२१ मध्ये २६४३ भारतीयांनी न्यूझीलंडचे नागरिकत्व स्वीकारले आहे. २१८७ नागरिकांनी नेदरलँडचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

Story img Loader