मोदी सरकार लवकरच एक नवीन योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत टपाल खाते लोकांच्या घरी गंगाजल पोहोचवेल. दिल्लीत एका पत्रकार परिषदेस बोलताना केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली. मी टपाल खात्याला अशा एका योजनेची आखणी करण्यास सांगितले आहे की ज्यायोगे ई-कॉमर्सचा वापर करून लोकांना घरपोच गंगाजल पोहोचवणे शक्य होईल, असे प्रसाद यांनी सांगितले.
गंगाजल थेट हरिद्वार आणि ऋषिकेश येथून लोकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल. यासाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. डिजिटल इंडिया विषयी पत्रकारांशी संवाद साधताना प्रसाद यांनी ही माहिती दिली. असे असले तरी ही योजना कधी सुरू होणार हे सांगण्यात आलेले नाही.

Story img Loader