राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Indian President Election 2022) जाहीर झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल, असं दुपारी जाहीर करण्यात आलं. त्यानंतर लगेचच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. तसेच त्यांनी यावेळी शुक्रवारी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही सांगितलं.

विरोधकांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याची कल्पना मागेही मांडण्यात आली होती. ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने काँग्रेसने पुढाकार घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. “सोनिया गांधींनी मला सर्व पक्षांसोबत चर्चा करुन कोणाला उमेदवारी देता येईल यासंदर्भात चाचपणी करण्यास सांगितलं आहे. मी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांनीही यासंदर्भात संमती दर्शवलीय. मी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, डीएमकेचे नेते आणि तृणमूलच्या नेत्यांचीही भेट घेणार आहे. यानंतर सर्वांच्या भेटीची तारीख निश्चित केली जाईल,” असं खरगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

maharashtra assembly election 2024 raj thackeray rally in pune
‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
Amit Shah On Jharkhand Election 2024
Jharkhand Election 2024 : झारखंडमधल्या घुसखोरांना हुडकण्यासाठी घेणार ‘हा’ निर्णय; अमित शाह यांचं मोठं आश्वासन
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

नक्की वाचा >> विश्लेषण : राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? संख्याबळ भाजपला कसे अनुकूल?

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून मुंबईत तळ ठोकून असलेल्या खरगे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार आपण पवारांची आज भेट घेतली असं सांगतानाच आज (शुक्रवारी) उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही खरगे म्हणाले. लवकरच विरोधी नेते दिल्लीत एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करतील, असे पवार यांनी बैठकीनंतर सांगितले. उद्धव ठाकरेंसोबतची बैठक ही विरोधीपक्षांच्या मुख्य नेत्यांपैकी पहिल्याच मोठ्या नेत्यासोबतची बैठक असणार आहे. त्यामुळे या बैठकीत संभाव्य उमेदवार कोण असू शकतं यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार असल्याचं समजते.

लोकसभेत प्रचंड बहुमत असलेल्या भाजपाकडून ‘एनडीए’च्या उमेदवाराची सहमतीने निवड केली जाईल. विरोधकांमध्ये मात्र काँग्रेस तसेच, अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सहमतीच्या उमेदवाराची निवड करणे जिकिरीचे होऊ शकते.

नवे राष्ट्रपती कधी शपथ घेणार?
नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उमेदवारांबद्दल उत्सुकता
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलै रोजी संपत असून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही. नवे राष्ट्रपती बिनविरोध निवडले जावेत यासाठी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र विरोधकांकडून उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची अधिक शक्यता असल्याने दोन्ही बाजूंकडील संभाव्य उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपाचे धक्कातंत्र
भाजपाकडून यावेळीही उमेदवार निवडीत धक्कातंत्र वापरले जाऊ शकेल. गेल्या निवडणुकीत रामनाथ कोिवद यांना उमेदवारी देऊन भाजपाने विरोधकांना अचंबित केले होते. कोिवद हे बिहारचे तत्कालीन राज्यपाल होते व ते अनुसूचित जातीतून येतात. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अनुसूचित जातीतील मीरा कुमार यांना उमेदवारी दिली होती. कोविंद यांना एकूण मतमूल्यांपैकी ६५.६५ टक्के म्हणजे ७,०२,०४४ मतमूल्य मिळाले होते. 

अद्ययावत यादी
१५ राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागापैकी १६ जागांवर शुक्रवारी मतदान होणार असून ४१ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व हरियाणा चार राज्यांमध्ये जागांच्या संख्येपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यसभेतील सदस्यांचे मतमूल्य महत्त्वाचे असल्याने राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून राज्यसभेतील ‘मतदारां’ची यादी अद्ययावत केली जाईल.