IIndian Railways on Tatkal Ticket Booking Timings : भारतीय रेल्वेकडून येत्या १५ एप्रिलपासून तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. या दरम्यान भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने स्पष्टीकरण देत अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एसी आणि नॉन-एसी क्लासेस याबरोबरच एजंट यांच्यासाठी तात्खाळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलले असल्याची माहिती देणाऱ्या खोट्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर याबद्दल रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

“सोशल मीडिया चॅनेल्सवर काही पोस्ट फिरत आहेत ज्यात तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठीच्या वेगवेगळ्या वेळेबद्दल उल्लेख आहे. एसी किंवा नॉन-एसी क्लासेससाठी तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळेत सध्या अशा प्रकारचा कोणताही बदल प्रस्तावित नाहीत. एजंटसाठी मंजूर करण्यात आलेल्या बुकिंग वेळेतही कोणताही बदल नाही,” असे आयआरसीटीसीने त्यांच्या निवेदनातम म्हटले आहे

सध्याच्या वेळा काय आहेत?

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे तात्काळ ई-तिकीट हे एक दिवस आधी बुक करता येते, ज्यामध्ये प्रवास सुरू होण्याची तारीख वगळली जाते. ओपनिंगच्या दिवशी एसी क्लाससाठी (२ए/३ए/सीसी/ईसी/३ई) भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता आणि नॉन-एसी क्लाससाठी (एसएल/एफसी/२एस) भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११:०० वाजता हे तिकीट बुक करता येते. विशेष म्हणजे, फर्स्ट एसी सोडून सर्व क्लासमध्ये तत्काळ बुकिंग करता येते.

तात्काळ तिकीटासाठी किती पैसे जास्त द्यावे लागतात?

तात्काळ तिकीटासाठी प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटावर सामान्य तिकिटाव्यतिरिक्त काही ठराविक शुल्क आकारले जाते. किमान आणि कमाल शुक्लाच्या आत सेकंड क्लाससाठी मूळ भाड्याच्या १० टक्के आणि इतर सर्व क्लासेससाठी मूळ भाड्याच्या ३० टक्के दराने हे शुल्क निश्चित केलेले आहे. कन्फर्म झालेले तात्काळ तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हाला कोणताही रिफंड दिला जात नाही. आचानक रद्द केल्यास आणि वेटिंग लिस्टमधील तत्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमांनुसार शुल्क कापले जाते.