जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) काश्मीर पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार ही कारवाई शेवटच्या टप्प्यात असून चकमक सुरू असलेल्या संपूर्ण भागाची तपासणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काश्मीर विभागीय पोलिसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कुलगाम पोलिसांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. या संपूर्ण भागात शोधमोहीम राबवण्यात आली आहे.”

गुरुवारी दुपारपासून दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू

याआधी पोलिसांनी सांगितलं होतं की, सीमेवर दहशतवाद्यांबरोबर मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. ही चकमक गुरुवारी दुपारी कुलगाम जिल्ह्यातील डीएच पोरा भागात सुरू झाली होती. या संयुक्त कारवाईत ३४ राष्ट्रीय रायफल, ९ पॅरा इलिट स्पेशल फोर्स युनिट, पोलीस आणि सीआरपीएफचा सहभाग होता.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बेछुट गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद

दरम्यान, १५ नोव्हेंबरला नियंत्रण रेषेवर उरी भागातही चकमक झाली होती. यानंतर ऑपरेशन काली राबवत भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.