जम्मू-काश्मीरच्या सियाचेन विभागात शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनात लष्कराच्या गस्तिपथकातील एका जवानाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जवान बेपत्ता आहे.
सियाचेनच्या तुर्तुक क्षेत्रात शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. त्यात लष्कराच्या गस्तिपथकातील दोन जवान अडकले. त्यातील लान्स हवालदार भवन तमांग यांना जखमी अवस्थेत बर्फाच्या ढिगाऱ्यातून शोधण्यात यश आले आणि नजीकच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तमांग दार्जिलिंगजवळच्या लोपशू गावचे रहिवासी होते.
दुसरा जवान बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

Story img Loader