कॅम्पस परिसरात अनधिकृत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय वंशाची विद्यार्थिनी अचिंथ्य शिवलिंगम हिला अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाविरुद्ध यूएसमधील प्रमुख विद्यापीठांमध्ये सतत निषेध सुरू असताना हा प्रकार घडला आहे .

तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे जन्मलेल्या आणि कोलंबस, ओहायो येथे राहिलेल्या शिवलिंगमला गुरुवारी दुसऱ्या सहकारी विद्यार्थी हसन सय्यदसह अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी विद्यार्थी आंदोलकांनी विद्यापीठाच्या मॅककॉश प्रांगणात तंबू ठोकले होते, असं प्रिन्स्टन विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी साप्ताहिकाने वृत्त दिले. आंदोलकांनी तंबू बांधून धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर काहीच मिनिटांत विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Road tax collection, heavy vehicles, Mumbai,
मुंबईच्या वेशीवर जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसुली?
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…

हेही वाचा >> EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; न्यायमूर्ती म्हणाले…

सुरुवातीला सुमारे ११० लोकांचा जमाव होता. कालांतराने याला प्रतिसाद वाढत गेला आणि गुरुवारी दुपारपर्यंत ३०० जण जमले.
प्रिन्स्टन विद्यापीठाचे प्रवक्ते जेनिफर मॉरील म्हणाले की, “सार्वजनिक सुरक्षा विभागाकडून आंदोलन थांबवण्यासाठी आणि क्षेत्र सोडण्यासाठी वारंवार चेतावणी दिल्यानंतर दोन पदवीधर विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून कॅम्पसमधून ताबडतोब प्रतिबंधित करण्यात आले आहे.”

प्रिन्स्टन स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन (SJP), प्रिन्स्टन पॅलेस्टाईन लिबरेशन कोॲलिशन आणि प्रिन्स्टन इस्रायली वर्णभेद डायव्हेस्ट (PIAD) यासह कॅम्पस गटांनी हे निषेध आंदोलन आयोजित केले होते. दरम्यान, विद्यापीठ परिसरात कोणत्याही प्रकारचा निषेध केल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच देण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात शेकडो लोकांना अटक

गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात १०० हून अधिक लोकांना अटक केल्यानंतर आयव्ही लीग शाळा हार्वर्ड आणि येलसह संपूर्ण यूएसमधील प्रमुख विद्यापीठांमध्ये निदर्शने तीव्र झाली आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात जवळपास ५५० जणांना अटक करण्यात आली आहेत.

Story img Loader