Indian Student Died in US : भारतातील तेलंगणातील मूळ रहिवासी असलेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. स्वतःच्या वाढदिवसाला त्याने चुकून स्वतःवरच गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू ओढावला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्यन रेड्डी या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा १३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. तो अमेरिकेतील जॉर्जिया येथील अटलांटा येथे राहतो. वाढदिवशी त्याने त्याची शिकारीची बंदूक स्वच्छ करण्याकरता बाहेर काढली. पण ती स्वच्छ करताना त्याच्या हातून ट्रिगर दाबला गेला आणि त्याच्या छातीत गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
Hyderabad Man Shoots At Girlfriend Father With Air Gun accused arrested
प्रेयसीला अमेरिकेला पाठवलं म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर केला गोळीबार; कुठे घडली घटना?
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा >> Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!

मित्र धावले पण…

बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकताच शेजारच्या खोलीत बसलेले आर्यनच्या मित्रांनी तत्काळ धाव घेतली. परंतु, ते पोहोचेपर्यंत आर्यन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मित्रांनी त्याला लागलीच रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आर्यन रेड्डी हा अटलांटा येथील कन्सास स्टेट विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्सच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होता. तेलंगणातील भुवानगरीच्या पेड्डराव पाली गावातील तो आहे. आर्यनचा मृतदेह आज रात्री तेलंगणात आणला जाणार आहे.