रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबारात जखमी झाल्याचं वृत्त आहे. केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

हजारो विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यात आलं असून अद्याप हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हसह दुसऱ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विशेष दूत म्हणून पाठवण्यात आलेल्या चार मंत्र्यांपैकी जनरल सिंग हे एक आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यावर गोळी झाडली गेल्याची माहिती दिली.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध

युक्रेनची राजधानी कीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी आज एएनआयला हा विद्यार्थी किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. युद्धादरम्यान, हे सगळं होत असल्याचंही मंत्री म्हणाले आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना –

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले असून अद्यापही त्यांचा भारतीय दूतावसाशी संपर्क होऊ शकत नाही. येथील सुमी शहरातील सुमी विद्यापीठातील काही विद्यार्थानी द इंडियन एक्सप्रेसह्णशी संवाद साधून आपली व्यथा व्यक्त केली.

Russia Ukraine War : भारतीय विद्यार्थी भयग्रस्त ; मायभूमीत येण्यासाठी व्याकूळ

या युद्धामुळे अद्याप संपर्कयंत्रणा उद्ध्वस्त झालेली नाहीये, एवढाच येथील विद्यार्थ्यांना दिलासा आहे. केरळच्या कोल्लम येथील विद्यार्थिनी आर. मनिषा हिने सांगितले, की आम्ही स्वत:ला कशात तरी गुंतवून घेत आहोत. परंतु मायदेशात आमचे आई-वडील, इतर नातलग प्रचंड चिंतेत आहेत.

हरियाणाच्या पानिपत येथील २० वर्षीय श्रुती त्यागी हिने सांगितले, की धोक्याची घंटा (सायरन) वाजू लागली की दिवसातून किमान तीनदा आम्ही आमच्या वसतिगृहाच्या तळमजल्यातील तळघरांत (बंकर) लपतो. इथे कुठेही शांतता नाहीये. आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकून गेलो आहोत.

Story img Loader