विद्यार्थ्यांला मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या एका समूहाने भारतीय शिक्षकाला बेदम मारहाण करण्याची घटना मालदीवमध्ये घडली आहे. या मारहणीत शिक्षक जबर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे.
या बाबत कुमुंधू शाळेतील मूसा हसन या शिक्षकांनी सांगितले की, जवळपास ३० जणांचा एक समूह जबरदस्तीने शाळेच्या कार्यालयात घुसला आणि सुभाषकुमार या भौतिकशास्त्राच्या शिक्षकाला त्यांनी मारहाण केली.
शाळेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून सुभाषकुमार यांना वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा समूहाने त्यांना शाळेच्या सभागृहात ढकलले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिक्षकाच्या डोक्याला आणि शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत.

Story img Loader