Indian Student in UK Facing Challenges: शिक्षणानिमित्त मोठ्या संख्येनं भारतीय तरुण विदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. विदेशात उच्च शिक्षण घेऊन आपल्या भवितव्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या भारतीय विद्यार्थ्यांकडून केला जातो. पण काही भारतीयांना यामध्ये असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका भारतीय तरुणीच्या पोस्टमुळे ब्रिटनमध्ये विदेशातील नागरिकांना वास्तव्य करण्यात येणाऱ्या अशाच अडचणी अधोरेखित झाल्या आहेत. या पोस्टवर नेटिझन्सकडून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

२०२१ साली सदर तरुणी शिक्षणासाठी यूकेमध्ये स्थलांतरीत झाली. २०२२ मध्ये पदवी मिळाल्यापासून ही भारतीय तरुणी यूकेमध्येच नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. पण तिच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. आता तिच्या यूकेमधील वास्तव्यासाठीच्या व्हिसाची मुदत संपुष्टात येत असून त्यामुळेच सोशल मीडियावर आपल्याला नोकरी मिळण्यासाठी या तरुणीनं कळकळीची विनंती केली आहे. त्यासाठी फुकट काम करण्याची तयारीही तिनं दाखवली आहे!

himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
AMU Minority Status Case
AMU Minority Status Case: अलीगढ मुस्लीम विद्यापीठ ही…
elon musk daughter Vivian Jenna Wilson
Elon Musk Daughter: ‘अमेरिकेत माझे भविष्य कठीण’, ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या तृतीयपंथी मुलीनं व्यक्त केली खंत
L K Advani Birth day Story
Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?
justin treudeau s jaushankar canada india
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली म्हणून कॅनडानं वृत्तसंस्थेलाच केलं ब्लॉक; आगळिकीवर भारताची तीव्र नाराजी!
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
Kamala Harris emotional speech after election defeat
निवडणुकीतील पराभव मान्य, पण लढाई कायम; भावनिक भाषणात कमला हॅरिस यांचे वक्तव्य
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

नेमकं काय आहे या पोस्टमध्ये?

सदर तरुणीनं केलेल्या पोस्टमध्ये सविस्तर व्यथा मांडली आहे. “माझा शिक्षणासाठीचा व्हिसा येत्या ३ महिन्यांत संपत आहे. त्यामुळे मला आणखी काही काळ यूकेमध्ये राहाता यावं, यासाठी ही पोस्ट रीशेअर करा”, असं या तरुणीनं पोस्टच्या सुरुवातील म्हटलं आहे. “मी एक भारतीय विद्यार्थिनी आहे. २०२१ मध्ये उच्चशिक्षणासाठी मी यूकेमध्ये दाखल झाले. २०२२ मध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. पण तेव्हापासून मी ब्रिटनमध्ये व्हिसा-स्पॉन्सर्ड नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे”, असं या पोस्टमध्ये तरुणीनं नमूद केलं आहे.

“पण ब्रिटनमधील नोकरीची बाजारपेठ पाहाता मला, माझ्या पदवीला, माझ्या क्षमतांना इथे काही किंमतच नाहीये असं मला वाटतंय. मी आत्तापर्यंत ३०० हून अधिक नोकऱ्यांसाठी अर्ज केले आहेत. मी करत असलेली ही पोस्ट यूकेमधील माझं भवितव्य घडवण्याच्या प्रयत्नांमधली शेवटची संधी आहे. मला डिझाईन इंजिनिअरिंग पदासाठीची व्हिसा स्पॉन्सर्ड नोकरी हवी आहे”, असं म्हणत या तरुणीनं तिचं शिक्षण व अनुभवाची सविस्तर माहिती पोस्टमध्ये दिली आहे.

“मी फुकट काम करायलाही तयार!”

दरम्यान, आपण कोणत्याही पगाराविनाही काम करायला तयार आहोत, असं या तरुणीनं म्हटलं आहे. “मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दिवसाचे १२ तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करेन. मला एका महिन्यासाठी नोकरीवर ठेवा. मी फुकट काम करेन. जर मी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही, तर मला तिथल्या तिथे नोकरीवरून काढून टाका. मी एकही प्रश्न विचारणार नाही”, असं या तरुणीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हिसा स्पॉन्सर्ड नोकरीच का?

सदर भारतीय तरुणी व्हिसा स्पॉन्सर्ड नोकरीसाठी प्रयत्नशील असण्यामागे ब्रिटनचे व्हिसासंदर्भातील नियम कारणीभूत ठरले आहेत. ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा देण्याबाबत काही विशिष्ट नियम लागू केले जातात. त्यानुसार, सध्याच्या व्यवस्थेमध्ये विदेशी विद्यार्थ्यांना टियर ४ जनरल स्टुडंट व्हिसा दिला जातो. यावर विद्यार्थ्यांना शिक्षण आणि पार्टटाईम नोकरी करता येते.

भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट व्हिसासाठी अर्ज करता येतो. यावर विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यानंतरही दोन वर्षांपर्यंत ब्रिटनमध्ये वास्तव्य करून नोकरी करता येते. यासाठी नोकरीच्या ऑफर लेटरची पूर्वअटदेखील नाही. पण ही मुदत संपल्यानंतरदेखील ज्या विद्यार्थ्यांना तिथे वास्तव्य करायचं आहे, त्यांना व्हिसा स्पॉन्सर्ड नोकरी मिळवणं आवश्यक आहे. अशा नोकरीतून या विद्यार्थ्यांचा व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. पण त्यासाठी नोकरी देणाऱ्या कंपनीकडे तसं स्पॉन्सरशिप लायसन्स असणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

सदर भारतीय तरुणीला समस्यांचा सामना करावा लागत असताना एकीकडे सोशल मीडियावर या तरुणीबद्दल सहवेदना व्यक्त होताना दुसरीकडे तिच्या सोशल पोस्टवरून तिला लक्ष्यही केलं जात आहे. “या प्रकारच्या हवालदील पोस्टमुळे विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची प्रतिमा मलीन होत असून रास्त उमेदवारांना न्याय्य संधी नाकारली जाते”, अशी कमेंट एका युजरनं केली. तर दुसऱ्या युजरनं “भारतीयांना गुलाम म्हणून काम करणं आवडतं, त्यांची मानसिकता बदलणं फार अवघड आहे”, अशी टीकात्मक टिप्पणी केली आहे.

एका युजरनं मात्र सदर तरुणीची अवस्था विषद केली आहे. “या तरुणीच्या मनात आत्ता काय चाललं असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. येत्या ३० दिवसांत तिला नोकरी मिळाली नाही तर तिला लागलीच भारतात परत पाठवलं जाईल आणि इथे आल्यावर तिला भरमसाठ कर्ज चुकवावं लागेल”, अशी कमेंट करण्यात आली आहे.