गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या राजधानीत भारताच्या पदकविजेच्या महिला कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यांच्या बरोबरीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी काही पुरुष कुस्तीपटूही आंदोलनात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात या आंदोलनाची चर्चा असून भाजपा खासदार व कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी वाढू लागली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या आव्हानाला आता कुस्तीपटूंकडून प्रतिआव्हान देण्यात आलं आहे.

महिला कुस्तीपटूंनी केलेले लैंगिक छळाचे आरोप बृजभूषण सिंह यांनी फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं होतं. यादरम्यान, बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा महिला कुस्तीपटूंना आरोप सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलं. त्यावर महिला कुस्तीपटूंनी उलट बृजभूषण सिंह यांनाच खुलं आव्हान दिलं आहे.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
Neelam Rane on Nitesh Rane
Neelam Rane : “आई म्हणून मला भीती वाटते…”, नितेश राणेंबाबत नीलम राणेंना वाटते ‘ही’ काळजी!
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Arjun Kapoor And Malaika Arora
“त्रासदायक लोकांना…”, अर्जुन कपूरने ब्रेकअप बद्दल खुलासा केल्यानंतर मलायका अरोराने केलेली पोस्ट
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप

बृजभूषण सिंह यांचं आव्हान

“मी माझी नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट कुठलीही टेस्ट करायला तयार आहे. मात्र माझी ही अट आहे की माझ्यासह विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचीही चाचणी केली जावी. हे दोन्ही पैलवान जर त्यांची टेस्ट करायला तयार असतील तर त्यांनी पत्रकार परिषद बोलवून तशी घोषणा करावी. त्यांनी घोषणा केली तर मी कुठल्याही टेस्टला सामोरा जायला तयार आहे. मी आजही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि उद्याही असेन. देशाला मी हे वचन देतो की मागे हटणार नाही”, अशी फेसबुक पोस्ट बृजभूषण सिंह यांनी केली आहे.

दरम्यान, त्यांच्या या पोस्टची चर्चा सुरू होताच त्यावर कुस्तीपटूंनी उत्तर दिलं आहे. “त्यांनी विनेश (फोगाट) आणि बजरंग (पुनिया)चं नाव घेतलंय. पण फक्त विनेशच नाही, जेवढ्या मुलींनी तक्रार केलीये, त्या सगळ्या नार्को टेस्टसाठी तयार आहेत. फक्त ही नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला हवी. सगळ्या देशाला कळलं पाहिजे की त्यांनी देशाच्या मुलींबरोबर केवढं दुष्कृत्य आणि अन्याय केला आहे”, असं अव्हान भारताची पदकविजेती कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं दिलं आहे.