तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन आलेल्या सोशल नेटवर्किंगने अवघ्या जगभरातील तरुण मंडळींना वेड लावले असताना भारतीय तरुणाई यात आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. भारतातील किशोरवयीन आणि तरुण मुले दिवसाचा ८६ टक्के वेळ म्हणजेच जवळपास २० तास फेसबुकला चिकटून असते, असा अहवाल मॅककॅफे या कंपनीने केला आहे. तर त्यांचा ५४ टक्के वेळ ट्विटरवर जातो, असेही कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे.
कंपनीने सर्वेक्षण केलेल्या ९७ टक्के भारतीय किशोरवयीन मुलांना सोशल नेटवर्किंग सहज उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि चेन्नई या शहरांतील किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणाद्वारे मॅककॅफेने हा अंदाज काढला आहे. सोशल नेटवर्किंग आणि एकूणच डिजीटल मीडियामुळे मुले व पालक यांच्यातील दरी वाढत चालली असून त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होतो आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४५ टक्के मुलांकडे इंटरनेट वापरासाठी स्मार्टफोन आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी वयाच्या १३व्या वर्षी सोशल नेटवर्किंग साइट्सवर खाते खोलतात, असेही या अहवालात म्हटले आहे. सोशल नेटवर्किंगकडे असलेल्या मुलांच्या वाढत्या ओढय़ाबाबत पालक चिंतीत आहेत.     

मुंबई, दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि चेन्नई या शहरांतील किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांशी बोलून हा अंदाज काढला आहे.

Story img Loader