3rd US plane with 112 deportees lands at Amritsar airport : अमेरिकेतली ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांवर सुरू केलेल्या कारवाई अंतर्गत भारतीयांना परत पाठवले जात आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ११२ भारतीयांना घेऊन तिसरे विमान रविवारी रात्री अमृतसरमध्ये दाखल झाले. ७ अमेरिकन हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर (7 A US Air Force C-17 Globemaster) विमान रात्री १० वाजता अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. गेल्या १० दिवसात भारतात दाखल झालेले हे तिसरे विमान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विमानातून परत पाठवण्यात आलेल्या ११२ भारतीयांमध्ये ४४ जण हे हरियाणा येथील आहेत, तर ३३ जण गुजरात, ३१ जण पंजाब, २ उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. काही बेकायदेशीर स्थलांतरितच नागरिकांचे कुटुंबिय देखील अमृतसर येथील श्री गुरू पाम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना घेण्यासाठी दाखल झाले होते.

शनिवारी रात्री उशिरा ११६ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन दुसरे अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर दाखल झाले होते. या विमानातीला पुरुषांनी दावा केला की त्यांना संपूर्ण विमान प्रवासादरम्यान बेड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. दुसऱ्या विमानात परतलेल्या ११६ निर्वासितांमध्ये ६५ जण हे पंजाब, ३३ जण हरियाणा, ८ गुजरात, प्रत्येकी दोन जन हे उत्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थान तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश होता.

पुन्हा स्थलांतरितांना बेड्या

“संपूर्ण प्रवासादरम्यान आमच्या हात आणि पायांमध्ये बेड्या घालण्यात आल्या होत्या. विमानात तीन लहान मुले आणि तीन महिला होत्या ज्यांना बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या. विमान अमृतसर येथे उतरण्याच्या आधी बेड्या काढण्यात आल्या,” असे एका स्थलांतरिताने सांगितले.

दरम्यान यामध्ये पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील राजापूर येथील दोन निर्वासितांना विमान अमृतसर येथे विमान उतरताच एका खूनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली. संदीप सिंग उर्फ सन्नी आणि प्रदीप सिंग अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात २०२३ मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अमेरिकेतली १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन पहिले विमान अमृतसर येथे ५ फेब्रुवारी रोजी उतरले होते. या स्थलांतरितांमध्ये १३ लहान मुलांचा देखील समावशे होता. यावेळी स्थलांतरितांना विमान अमृतसरमध्ये दाखल झाल्यानंतरच बेड्यांमधून मुक्त करण्यात आले होते. अमेरिकेने तीन विमानांमधून आत्तापर्यंत एकूण ३३२ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवले आहे.