Indians Entering US via Canada: गेल्या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारताचा हात असल्याचं विधान करून वाद निर्माण केला होता. त्यानंतर भारत व कॅनडा द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. अजूनही दोन्ही देशांमध्ये अपेक्षित सुसंवाद निर्माण होऊ शकलेला नसतानाच आता आणखी एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. कॅनडातून मोठ्या संख्येनं भारतीय अमेरिकेत स्थलांतर करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या वर्षी एकट्या जूनमध्ये विक्रमी संख्येनं भारतीय अमेरिकेत दाखल झाले असून यूकेमध्येही स्थलांतराचं प्रमाण मोठं आहे.

कॅनडात नेमकं घडतंय काय?

कॅनडामधून अमेरिकेत बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण वाढू लागल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं असून त्यानुसार एकट्या जून महिन्यात तब्बल ५ हजार १५२ भारतीयांनी आवश्यक त्या कागदपत्रांशिवाय अमेरिकेत प्रवेश केला आहे. यासाठी या वृत्तामध्ये ताज्या यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन अहवालातील माहितीचा हवाला दिला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत प्रवेश केलेल्या भारतीयांचं हे सर्वाधिक प्रमाण आहे. एवढंच नसून गुन्हेगारीमुळे अशांत असणाऱ्या मेक्सिकोमधून डिसेंबर २०२३ पासून अमेरिकेत आलेल्या नागरिकांपेक्षा भारतीयांचं हे प्रमाण अधिक आहे.

Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cm devendra fadnavis
मुख्यमंत्र्यांना जोरगेवारांनी रोखले! कर्मवीर मा. सा. कन्नमवार रौप्य महोत्सवी सोहळ्यात नेमके काय घडले?
Donald Trump is advocating using economic pressure to annex Canada as part of the United States
Trump on Canada: अमेरिका कॅनडावर ताबा मिळवणार का?
Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
Loksatta anvyarth Canadian Prime Minister Justin Trudeau resigns India Canada Relations
अन्वयार्थ: अखेर ट्रुडो जाणार!
Justin Trudeau resignation news in marathi
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा… भारत-कॅनडा संबंध आता तरी सुधारतील? खलिस्तानवाद्यांना अभय मिळणे थांबेल?
Justin Trudeau
Canada PM Justin Trudeau : जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदावरून पायउतार होणार? आजच घोषणा होण्याची शक्यता; पण नेमकं कारण काय?

अमेरिका व कॅनडा यांच्यात जवळपास ९ हजार किलोमीटरची खुली सीमारेषा आहे. ही जगातली सर्वात लांब अशी खुली सीमा मानली जाते. मेक्सिको व अमेरिकेच्या सीमेपेक्षा ही सीमा दुप्पट तर भारत व चीनच्या ३४०० किलोमीटरच्या सीमेपेक्षा जवळपास तिप्पट लांबीची ही खुली सीमा आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतीयांना धक्का; आता कॅनडात नोकरी मिळणे कठीण; कारण काय?

वर्षभरात ४७ टक्क्यांनी प्रमाण वाढलं!

दरम्यान, अमेरिकी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ४७ टक्क्यांनी वाढलं आहे. जानेवारी महिन्यात हे प्रमाण २५४८ होतं. जूनपर्यंत ते महिन्याला ३७३३ नागरिक इतकं वाढलं. तर एकट्या जूनमध्ये ५१५२ भारतीयांनी अमेरिकेत अवैधरीत्या पायी प्रवेश केला. यात अवैधरीत्या प्रवेश करणाऱ्यांना ताब्यात घेणे, त्यांची पुन्हा कॅनडात पाठवणी करणे किंवा सीमेवरच लक्षात आल्यास त्यांना प्रवेशच नाकारणे, अशा उपायांचा अवलंब अमेरिकी प्रशासनाकडून केला जात आहे.

एकीकडे अमेरिकेत कायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांचं प्रस्थ वाढत असताना दुसरीकडे बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १.५ टक्के इतकं आहे. पण त्यांचा अमेरिकेच्या एकूण प्राप्तीकर भरण्यामधला हिस्सा तब्बल ५ ते ६ टक्क्यांच्या घरात आहे.

अमेरिकेत प्रवेशासाठी कॅनडाचा वापर?

दरम्यान, अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इतर देशातील नागरिकांकडून कॅनडाच्या भूमीचा वापर केला जात असल्याचं बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॅनडातील व्हिसा प्रक्रिया अधिक कठोर केली जावी, अशी मागणी अमेरिकेकडून केली जात आहे. या प्रक्रियेतील कच्च्या दुव्यांचा फायदा घेऊन इतर देशातील नागरिक कॅनडाचा व्हिसा मिळवतात व तिथून खुल्या सीमाभागातून अमेरिकेत प्रवेश करतात, असा दावा केला जात आहे.

Story img Loader