मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवाचा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदने भारतीयांचे विचार संकुचित असल्याचे वक्तव्य केले आहे.
योगगुरू रामदेवबाबा यांचे निकटवर्तीय आणि माजी पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी हाफीज सईद याची भेट घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. वैदिक यांनी लाहोरमध्ये सईद याच्या निवासस्थानी त्याची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या भेटीमध्ये सईद याच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे वैदिक यांनी म्हटले आहे.
परंतु, या भेटीच्या मुद्द्यावरून  सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
यावर हाफीजने, आम्ही धर्म किंवा पंथ याचा विचार न करता प्रत्येकाला खुल्या मनाने भेटतो. परंतु, दुर्देवाने तथाकथित धर्मनिरपेक्ष भारताला त्यांचे पत्रकार वैदिक यांची भेट घेतल्याचे सहन होत नाही. हे भारतीयांच्या संकुचित वृत्तीचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader