Defensive Asylum Applications USA: विदेशात जाऊन चांगले आयुष्य जगण्याची धडपड दाखविणारा डंकी नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. विदेशात नोकरी मिळवायची आणि तिथेच स्थायिक व्हायचे ही स्वप्ने अनेक भारतीय तरुण पाहत असतात. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक स्थलांतरीत होत असतात. विशेषतः अमेरिकेत आसरा मागणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागच्या तीन वर्षांत अमेरिकेत आसरा मागणाऱ्यांच्या संख्येत ८५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार २०२१ साली ४,३३० भारतीय नागरिकांनी आश्रय मागण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २०२३ आर्थिक वर्षात ही संख्या वाढून तब्बल ४१,३३० लोकांनी अमेरिकेत आसरा मागितला आहे. भारतीय यंत्रणेने सांगितले की, यातली बहुसंख्य अर्जदार हे गुजरातमधील आहेत.
अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गुजराती नागरिकांची चढाओढ; आसरा मागणाऱ्यांच्या संख्येत भारतातून तीन वर्षांत ८५५ टक्क्यांची वाढ
US Asylum Applications: अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी भारतीय नागरिकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. अमेरिकेत आसरा मागणाऱ्यांच्या संख्येत तीन वर्षांत ८५५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-11-2024 at 19:36 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअमेरिकाAmericaआंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsगुजरातGujaratयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाUnited States of America
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians seeking asylum in america number increase 5 percent in 3 years kvg