Indian What Watch on Smartphone : मेट्रोमध्ये, बसमध्ये किंवा लोकलमध्ये तुम्हाला साधारण काय चित्र दिसतं? एवढंच नव्हे तुम्ही घरी एकत्र जेवायला बसलात तरी तुम्हाला एक कॉमन गोष्ट लक्षात येत असेल, ती म्हणजे सर्वजण मोबाईलमध्ये मान खाली घालून पाहत असतात. वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे सोशल मिडिया इन्फ्लुअन्सर आणि व्यावसायिक धनाढ्य बनत आहेत. एका अहवालानुसार, स्मार्टफोनवर एक ट्रिलियनपेक्षा जास्त तास भारतीय चिकटून असतात. इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील नागरिक व्हायरल व्हिडिओ आणि ऑस्कर विजेते पाहण्यात दंग असतात. तसंच ते आंतरराष्ट्रीय ट्रिप बुक करण्यासाठी स्क्रिनवर चिकटकलेले असतात. म्हणजेच, इंटरनेट डेटा विक्री वाढवण्यासाठी भारत सोन्याची खाण आहे.

२०२४ मध्ये १.१ लाख कोटी तास स्मार्टफोनवर घालवले

भारतीय स्मार्टफोन पाहण्यात १.१ लाख कोटी रुपये खर्च करतात. स्वस्त इंटरनेटमुळे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात इंस्टाग्रामपासून नेटफ्लिक्सपर्यंतच्या प्लॅटफॉर्मवर भारतीयांनी एकत्रितपणे २०२४ मध्ये १.१ लाख कोटी तास स्मार्टफोनकडे पाहत घालवले, असे EY ने म्हटले आहे.

सोशल मीडियाने टेलिव्हिजनला टाकलं मागे

सरासरी दररोज पाच तास मोबाईल स्क्रीनवर घालवतात, त्यापैकी जवळजवळ ७०% तास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यास युजर्स पसंती देतात, असे EY ने गुरुवारी प्रकाशित केलेल्या वार्षिक मनोरंजन अहवालात म्हटले आहे. यामुळे २०२४ मध्ये डिजिटल चॅनेल्स हे भारतातील २.५ लाख कोटी रुपयांच्या (२९.१ अब्ज डॉलर्स) मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठा विभाग बनले आहेत, ज्याने पहिल्यांदाच टेलिव्हिजनला मागे टाकले आहे.

भारतीयांनी त्यांच्या मोबाईल फोनवर घालवलेल्या दैनंदिन वेळेत इंडोनेशिया आणि ब्राझील नंतर तिसरा क्रमांक लागतो.