तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदुद्दीन ओवेसी हे यावेळी पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. उद्या (दि. १३ मे) हैदराबादमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ओवेसी यांच्या विरोधात भाजपाने हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. ओवेसी यांनी मुस्लीम, मागासवर्गीय आणि इतर अल्पसंख्याकांना लक्ष्य करून आपली मतपेटी बांधली आहे. भाजपाच्या विरोधात कडाडून प्रचार करणाऱ्या ओवेसींनी इंडिया आघाडीशी युती केलेली नाही. ओवेसींचा हा निर्णय पक्षासाठी फायद्याचा की तोट्याचा? भारतीय राजकारणात मुस्लिमांचे स्थान काय? या विविध विषयांबाबत ओवेसींनी हिंदुस्तान टाइम्स या संकेतस्थळाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुस्लीम व्यक्ती भारताचा पंतप्रधान कधी होणार? याबाबत भाष्य केले आहे.

या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे कोणते?

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. या तीन टप्प्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटत आहेत? या प्रश्नावर बोलताना ओवेसी म्हणाले, “बेरोजगारी, महागाई हे प्रमुख मुद्दे आहेत. तसेच भाजपाने मुस्लीम वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. भाजपाप्रमाणेच इंडिया आघाडीनेही मुस्लीम समुदायापासून अंतर राखले आहे. महाराष्ट्र हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ आहेत. इंडिया आघाडीने एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि नवी दिल्लीतही हाच कित्ता गिरवला गेला आहे. जर मुस्लिमांना उमेदवारीही दिली जात नसेल, याचा अर्थ लोकसभेत त्यांचे प्रतिनिधित्व निश्चितच कमी होणार.”

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

इंडिया आघाडीशी युती का नाही केली?

इंडिाय आघाडीशी सूत जुळविण्याबद्दल ओवेसी म्हणाले की, आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीनवेळा इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी निरोप दिला. मात्र त्यांच्या निरोपाची साधी दखलही इंडिया आघाडीने घेतली नाही. कुणी जर आम्हाला आघाडीत घ्यायला तयार नसेल तर आमच्यासाठी हा काही जगाचा अंत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमची राजकीय वाटचाल सुरूच ठेवू. उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यात छोट्या पक्षांशी आम्ही आघाडी केली आहे.

मुस्लीम पंतप्रधान कधी होणार?

भारताला मुस्लीम पंतप्रधान कधी मिळणार? असाही प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांना विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, नक्कीच एकेदिवशी भारताला मुस्लीम पंतप्रधान मिळेल. त्यातही हिजाब घातलेली महिला मुस्लीम भारताची पंतप्रधान होईल. कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेल, पण एकेदिवशी नक्कीच हे घडेल, अशी आशा ओवेसी यांनी व्यक्त केली.