|| अविनाश कवठेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बोगीबेल रेल-रोड पुलाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वाधिक लांबीचा दुमजली मोठा पूल बांधण्याचे जिकिरीचे काम पूर्णत्वास गेले आहे. दिब्रुगडसारखा दुर्गम भाग, वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, सातत्याने झालेली राजकीय स्थित्यंतरे अशी आव्हाने पेलत हे काम पूर्ण झाले असून तब्बल २१ वर्षांनंतर ब्रह्मपुत्र नदीवरील रेल-रोड या दुमजली पुलाचे आसामवासीयांचे स्वप्न साकार झाले आहे.
महत्त्वाकांक्षी बोगीबेल रेल-रोड या दुमजली पुलाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (२५ डिसेंबर) होणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीवरील हा महत्त्वाकांक्षी पूल नॉर्थइस्ट फ्रंटिअर रेल्वेचा असून हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून (एचसीसी) त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा हा पूल देशांच्या संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारत-चीनच्या सीमावर्ती भागात अरुणाचल प्रदेश येथील सैनिकी तळावर अत्याधुनिक शस्त्रसाठे कमी वेळात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही दुमजली उड्डाण पूल उपयुक्त ठरेल.
ब्रह्मपुत्रा नदीवरील हा पाचवा पूल बांधण्याची घोषणा सन १९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एच. डी. दैवेगौडा यांनी केली होती. त्यानंतर सन एप्रिल २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या दुमजली पुलाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. वाजपेयी यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले.
दुर्गम भाग, कुशल मनुष्यबळाची कमतरता यावर मात करून ४.९४ किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. ब्रह्मपुत्र नदीवरील हा पाचवा पूल असून रेल्वेसाठीच्या दोन मार्गिका आणि त्यावर रस्ता वाहतुकीसाठी तीन मार्गिका अशी या पुलाची रचना आहे.
‘दुमजली पुलाच्या उभारणीसाठी कुशल मनुष्यबळाची काही प्रमाणात कमतरता जाणवली. मात्र या कामात स्थानिकांना प्राधान्य दिल्यामुळे रोजगारनिर्मितीलाही हातभार लागला. पुलाच्या उभारणीसाठी पाश्चिमात्त्य देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे,’ असे एचसीसीच्या बोगीबेल रेल-रोड प्रकल्पाचे प्रमुख आर. आर. व्ही. किशोर यांनी सांगितले.