भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या मार्स ऑरबायटर अंतराळयनाची स्थिती व्यवस्थित असून या अंतराळयानाची पृथ्वीभोवतीची कक्षा रुंदावण्यात काल आलेली अडचण आज दूर झाली.
मंगळयानाची कक्षा वाढविण्याच्या चौथ्या टप्प्यात यानाची कक्षा एक लाखांहून अधिक किलोमीटरपर्यंत वाढविण्यात इस्रोला यश आले आहे. त्यामुळे ही मोहिम पुन्हा पूर्वपदावर आली आहे.
मंगळ मोहीम ही अतुलनीय कामगिरी
पृथ्वीपासून यानाचे कमाल अंतर ७१,२६३ कि.मी. पासून १ लाख कि.मी करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. मंगळ मोहीम १०० टक्के सुरक्षित असल्याचे इस्रोच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र मंगळयानाची कक्षा अपेक्षेप्रमाणे रुंदावण्यात आलेले अपयश हे चिंताजनक लक्षण असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले होते. परंतु, भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी पाच वाजता पृथ्वीपासूनचे जास्तीत जास्त अंतर १ लाख कि.मी पर्यंत वाढवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात यश आले.
मंगळ मोहिमेला पुण्याचाही हातभार!
मंगळ मोहिमेतील अडथळा दूर; मंगळयान चौथ्या कक्षेत दाखल
मंगळयानाची कक्षा वाढविण्याच्या चौथ्या टप्प्यात यानाची कक्षा एक लाखांहून अधिक किलोमीटरपर्यंत वाढविण्यात इस्रोला यश आले आहे.
First published on: 12-11-2013 at 11:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias mars mission back on track