भारताची ‘मार्स ऑरबायटर’ मोहीम अखेर २८ ऑक्टोबरला होणार आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा ४५० कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून एकूण २९९ दिवसांचा ऑरबायटरचा प्रवास असणार आहे. त्यासाठीचा ‘काऊंट डाऊन’ सुरू झाला असल्याचे वातावरण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये आहे. प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
या मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे ही तांत्रिक स्वरूपाची आहेत व एखादा उपग्रह मंगळाच्या कक्षेत पाठवून प्रयोग करण्याची क्षमता यात आजमावली जाईल.
तेथील संभाव्य जीवसृष्टी, लाल ग्रहाची छायाचित्रे, तेथील पर्यावरणाचा अभ्यास अशा अनेक उद्दिष्टांचा समावेश त्यात आहे, समितीने आम्हाला हा प्रकल्प पुढे नेण्यास हिरवा कंदील दिला आहे, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर.राव, प्रसिद्ध अंतराळ तज्ज्ञ रॉजहॅम नरसिंहा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे बंगलोर येथील प्राध्यापक यांचा या योजनेचा आढावा घेणाऱ्या समितीत समावेश होता.
कसे जाईल मंगळावर?
पृथ्वीच्या कक्षेतून सुटल्यावर ते दहा महिने खोल अवकाशात प्रवेश करील व सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत जाईल. नंतर ते मंगळाभोवती अंडाकार कक्षेत (३७२ कि.मी बाय ८० ००० किमी) मध्ये प्रवेश करील. मंगळावर मिथेन आहे किंवा नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न यात केला जाईल. मंगळवर जीवसृष्टी असण्यासाठी तिथे मिथेन असणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या-
मंगळावर सापडले पाण्याचे पुरावे
मंगळयानाची पहिली चाचणी यशस्वी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा