भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेले मंगळयान मध्यरात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी यशस्वीरित्या पृर्थ्वीच्या कक्षेबाहेर पडले आहे. मंगळयानाला मंगळाच्या दिशेने सोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व यांत्रिक बाबी पूर्ण झाल्या. मंगळयान मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा असलेल्या ट्रान्स मार्स इंजेक्शनमधील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. हे इंजेक्शन मंगळयानाला १ डिसेंबर रोजी टोचण्यात येणार आहे. आता सर्व गोष्टी नियोजनाप्रमाणे झाल्यास, पुढील ३०० दिवसात या यानाचा मंगळाच्या दिशेने प्रवास सुरु राहील.
५ नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटाहून ‘पीएसएलव्ही सी २५’ या यानाचे रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर ते आत्तापर्यंत पृथ्वीच्य प्रभाव कक्षेतच होते.  बंगळुरू येथे २५० शास्त्रज्ञांचा चमू मंगळयानाच्या सुखरूप प्रवासासाठी प्रयत्नशील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा