Yellow Metal Found in China : भारताचा शेजारील देश चीनमध्ये आणखी एक मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. या साठ्यामुळे चीनला एकप्रकारे जॅकपॉटच मिळाला आहे. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गान्सू प्रांत (वायव्य चीन), इनर मंगोलिया (उत्तर चीन) आणि हेलोंगजियांग प्रांत (ईशान्य चीन) येथे हा सोन्याचा साठा सापडला आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पिवळ्या धातूचे एकूण प्रमाण १६८ टन असल्याचे चीनमधील माध्यमांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, हुनान प्रांतात जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा शोध घेऊन चीनने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. पिंगजियांग काउंटीजवळ स्थित उच्च-गुणवत्तेचा सोन्याचा साठा अंदाजे १ हजार मेट्रिक टन इतकं सों सापडलं होतं. याचं मूल्य USD ८३ अब्ज (अंदाजे ७ लाख कोटी) पेक्षा जास्त आहे. हा उल्लेखनीय शोध दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण दीप खाणीला मागे टाकतो. ही खाण पूर्वी सर्वात मोठी खाण होती. ज्यामध्ये ९०० मेट्रिक टन सोने होते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले महत्त्वाचे तीन देश अमेरिका, जर्मनी आणि इटली आहेत.
चीन जगातील आघाडीचा सोने उत्पादक देश
चीन २ हजार २६४ टन सोन्याच्या साठ्यासह सहाव्या क्रमांकावर आहे. तर भारतात ८४०. ७६ टन सोनं आहे. चीनने जागतिक स्तरावर सोन्याच्या उत्पादनावर वर्चस्व राखून, जगातील आघाडीचे सोने उत्पादक म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. अंदाजे ३७५ टन उत्पादनासह, चीनमधील व्यापक खाण कार्यामुळे २०२२ मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचा १० टक्के वाटा होता.