देशाच्या २०११ मध्ये झालेल्या जनगणनेची धर्मनिहाय आकडेवारी मंगळवारी जाहीर झाली. यानुसार देशाची लोकसंख्या १२१.०९ कोटी असून, त्यात हिंदू ९६.६३ कोटी (७९.८ टक्के), मुस्लीम १७.२२ कोटी (१४.२ टक्के), ख्रिश्चन २.७८ कोटी (२.३ टक्के) तर शीख २.०८ कोटी (१.७ टक्के) आहेत.
जनगणनेची जातनिहाय आकडेवारी मात्र अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. २००१च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १०२ कोटी होती. त्यात हिंदूंचे प्रमाण ८०.४५ टक्के (८२.७५ कोटी) आणि मुस्लिमांचे प्रमाण १३.४ टक्के (१३.८ कोटी) होते. देशात आता बौद्धांची संख्या ८४ लाख (०.७ टक्के), जैन ४५ लाख (०.४ टक्के) आणि अन्य पंथीय ७९ लाख (०.७ टक्के) इतके आहेत. २९ लाख म्हणजेच ०.२ टक्के लोकांनी आपल्या धर्माचा उल्लेख केलेला नाही. हिंदूंप्रमाणेच २००१च्या जनगणनेच्या तुलनेत शिखांची संख्याही ०.२ टक्क्याने, बौद्ध समाजाची लोकसंख्या ०.१ टक्क्याने घटली आहे. २००१ ते २०११ या कालावधीत लोकसंख्यावाढीचा दर १७.७ टक्के होता. हा दर पाहिला तर हिंदूंमध्ये ही वाढ १६.८ टक्के, मुस्लिमांमध्ये २४.६ टक्के, ख्रिस्तींमध्ये १५.५ टक्के, शिखांमध्ये ८.४ टक्के, बौद्धांमध्ये ६.१ टक्के आणि जैनांमध्ये ५.४ टक्के इतकी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा