जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून तोरा मिरवणाऱ्या चीनचा भारताने रेकॉर्ड मोडला आहे. United Nations Population Fund च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा किंचितशी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, येत्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनपेक्षाही अधिक पुढे जाईल, असंही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

United Nations Population Fund च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या अहवालानुसार संपूर्ण जगाची लोकसंख्या ८ बिलिअनपेक्षाही अधिक झाली आहे. यामध्ये भारत आणि चीनचा सर्वाधिक वाटा आहे. भारत-चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची १४२.५७ कोटी नोंदवण्यात आली आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा >> वडिलांच्या चुकीतून मुकेश अंबानींनी घेतला ‘हा’ धडा, संपत्तीच्या वाटणीचं दुःख मुलांनी सहन करू नये म्हणून…

अहवालानुसार, भारताचा प्रजनन दर सरासरी २.० नोंदवण्यात आला आहे. तर, सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचं सरासरी आर्युमान ६९ वय होतं. आता ते वाढून ७१ झाले आहे. या अहवालात २०२२ मध्ये भारताची लोकसंख्या १४०.६ कोटी नोंदवण्यात आली होती. यापैकी ६८ टक्के १५ ते ६४ वयोगटातील लोकांचा समावेश होता. तर, नव्या अहवालानुसार, २० कोटींहून अधिक लोकसंख्या १५ ते २४ या तरुण वयोगटातील आहेत. धक्कादायक म्हणजे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा १.५६ टक्क्यांनी भारताची लोकसंख्या वाढली आहे.

“भारताची स्वतंत्र शक्तीशाली कथा आहे. भारत वेगाने शैक्षणिक, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान यात प्रगती करत आहे. या देशात २० कोटींहून अधिक जनता १५ ते २४ या वयोगटातील असल्याने नवे प्रयोग होण्याचा पर्याय आहे”, असं UNFPA मधील भारताच्या लोकप्रतिनिधी अॅण्ड्रे वोजनार यांनी म्हटलं आहे.

चीनची लोकसंख्या घटली

विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत असलेला चीन देश लोकसंख्येच्याबाबतीत जगभरात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, गेल्यावर्षी चीनची लोकसंख्या गेल्या सहा दशकांत पहिल्यांदा घसरली. तर, यंदाही या आकडेवारीत घसरण झालेली आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १४४.८५ कोटी नोंदवण्यात आली होती. तर, नव्या अहवालानुसार चीनमध्ये १४२.५७ लोकसंख्या असण्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >> राज्यातील वाघाच्या संख्येत २३ टक्क्यांनी वाढ; चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाघ

भारतात वेगाने वाढ

भारतात २०११ साली जनगणना झाली होती. त्यावेळी १० वर्षांच्या तुलनेत भारतात १.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर, सरासरी वाढ १.२ टक्के नोंदवण्यात आली होती. २०११ नुसार भारताची लोकसंख्या १२० कोटी आहे. तर, आता युएनपीएफने दिलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२.५७ कोटी असण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये भारताची जनगणना होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना काळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे ही जनगणना होऊ शकली नाही.