भारताचे रामल्लामधील प्रतिनिधी मुकूल आर्या हे पॅलेस्टाइनमधील भारतीय दुतावासामध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रसार माध्यमांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिलीय. मुकूल हे रविवारी भारतीय दूतावासात मृतावस्थेत आढळून आले.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुकूल यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना त्यांच्या मृ्त्यूमुळे मोठा धक्का बसल्याचं सांगितलंय.

“भारताचे रामल्लामधील प्रतिनिधी मुकूल रॉय यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसलाय. ते फार हुशार आणि हरहुन्नरी अधिकारी होती. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत आहेत, ओम शांती,” असं जयशंकर यांनी ट्विट करुन म्हटलंय.

पॅलेस्टाइनच्या परराष्ट्र मंत्रालयाने, ‘रामाल्ला येथील कार्यालयामध्ये भारताच्या राजदूतांचा मृत्यू झालाय,’ अशी माहिती देत वृत्ताला दुजोरा दिलाय. मुकूल यांचा मृतदेह भारतामध्ये परत पाठवण्यासाठी पॅलेस्टाइनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असून यासंदर्भातील कागदोपत्री पूर्तता करण्याचं काम सुरु आहे.

Story img Loader