अवघी २ मिनिटं पुरेल इतकंच इंधन शिल्लक असताना इंडिगोच्या एका विमानानं चंदीगड विमानतळावर सुरक्षित लँडिंग केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. मुळात अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झालेल्या या विमानानं दोन वेळा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. पण खराब हवामानामुळे ते प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी विमान वळवून चंदीगडला नेण्यात आलं. उतरल्यानंतर विमानात फक्त पुढची दोन मिनिटं पुरेल इतकंच इंधन शिल्लक होतं, याचा साक्षात्कार झाल्याचा दावा काही प्रवाशांनी केला आहे!

नेमकं घडलं काय?

ही सगळी घटना शनिवारी घडल्याचं समोर आलं आहे. याच विमानात प्रवास करणारे दिल्लीच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सतीश कुमार यांनी एक्सवर (ट्विटर) हा सगळा विमान प्रवासाचा थरार नमूद केला आहे. यातच त्यांनी विमान लँड झाल्यानंतर त्यात फक्त २ मिनिटं पुरेल इतकंच इंधन शिल्लक होतं असं समजल्याचा दावा केला आहे. एकीकडे इंडिगोनं विमानात पुरेसं इंधन होतं अशी बाजू मांडलेली असताना सतीश कुमार यांनी केलेली सविस्तर पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

शनिवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी इंडिगोचं 6E 2702 हे विमान अयोध्येहून दिल्लीच्या दिशेनं निघालं. ४ वाजून ३० मिनिटांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. पण ४ वाजून १५ मिनिटांनी खराब हवामानामुळे विमान उतरवता आलं नाही. त्यावेळी विमानाच्या पायलटनं विमानात ४५ मिनिटांचं होल्डिंग फ्युएल असल्याचं सांगितलं. पायलटनं दोन वेळा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला अपयश आलं. पण त्यानंतरही पुढची कृती करायला पायलटनं बराच वेळ वाया घालवला, असं सतीश कुमार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

विमानातील प्रवाशांमध्ये भीती

संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी, अर्थात पायलटच्या आधीच्या घोषणेनंतर तब्बल ७५ मिनिटांनी पायलटनं विमान चंदीगडच्या दिशेनं वळवत असल्याचं जाहीर केलं. “तोपर्यंत विमानातील अनेक प्रवासी भीतीमुळे अक्षरश: गारठले होते. शेवटी ६ वाजून १० मिनिटांनी, म्हणजे पायलटच्या पहिल्या घोषणेनंतर ११५ मिनिटांनी ते विमान चंदीगड विमानतळावर उतरलं”, असं सतीश कुमार यांनी सांगितलं.

“खाली उतरल्यानंतर आम्हाला समजलं की विमानात फक्त १ ते २ मिनीट पुरेल इतकंच इंधन शिल्लक होतं. प्रवाशांसाठी हा मोठा धक्का होता”,असं सतीश कुमार म्हणाले आहेत. तसेच, त्यांनी इंडिगोकडून ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे गोष्टी पाळल्या होत्या की नाही? असा सवालही उपस्थित केला आहे.

इंडिगोनं नियमांचं पालन केलं नाही?

दरम्यान, निवृत्त पायलट शक्ती ल्युम्बा यांनी यात इंडिगोची चूक असल्याचं म्हटलं आहे. “दोन वेळा विमान उतरवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर लागलीच विमान दुसरीकडे वळवायला हवं होतं. मात्र ते झालेलं दिसत नाही”, असं ल्युम्बा यांनी एक्सवर नमूद केलं आहे.

विमानात पुरेसं इंधन होतं – इंडिगो

दरम्यान, इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, विमानात पुरेसं इंधन होतं, असा दावा इंडिगोनं केला आहे. “खराब हवामानामुळे विमान उतरवता न आल्यामुळे पायलटनं अवकाशात पुन्हा एकदा गिरकी घेतली. हा पर्याय नियमाला धरूनच होता. तसेच, दुसऱ्या विमानतळावर विमान वळवण्यासाठी कोणत्याही वेळी विमानात पुरेसं इंधन उपलब्ध असतं”, असं इंडिगोनं म्हटलं आहे.